हस्तमैथून asked 6 years ago

1 उत्तर

होय. किशोरवयीन मुलं-मुली, स्त्री-पुरुषही हस्तमैथुन करतात. वयात आल्यानंतर (किशोरवस्थेत) मुला –मुलींमध्ये काही शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात त्यातूनच लैंगिक भावना निर्माण होतात. काहीना भिन्नलिंगी तर काहीना समलिंगी व्यक्तींविषयी आकर्षण निर्माण होते आणि यात काहीच गैर नाहीये. त्यातूनच लैंगिक सुख मिळवण्याची ओढ लागते. हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुन केल्याने पुढे जाऊन मुल होत नाही, लिंग वाकडे होते, वीर्य वाया जातं, मुल होत नाही, हे सर्व गैरसमज आहेत. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुन करताना कोणत्या धातूच्या, काचेच्या टोकदार वस्तू वापरल्या तर मात्र लैंगिक अवयवांना इजा होऊ शकते. ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.

हस्तमैथुनाविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक्स पाहा.

https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे – https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 4 =