प्रश्नोत्तरेअनावश्यक गर्भवती कशी टालावी दोन चार आठवड्यातील गर्भधारणा खाली कशी करता येत

1 उत्तर

भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. मात्र गर्भपात ही नियमितपणे वापरण्याची गर्भनिरोधक पद्धत नाही. गर्भपातासाठी वैद्यकीय तपासणी आणि देखरेख आवश्यक असते. वैद्यकीय गर्भपात कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या गर्भपात केंद्रामध्ये सर्व सुविधा मिळणं आवश्यक आहे. गर्भपात करण्यासाठी कोणतेही घरगुती उपाय उपलब्ध नाहीत. अशा प्रकारच्या उपायांमुळे स्त्रीच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात.   
गर्भधारणा नको असेल तर त्यासाठी कंडोम, तोंडावाटे घ्यायच्या संप्रेरक गोळ्या, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन पिल्स, संभोगाच्या आधी स्त्रीच्या योनिमार्गात सरकवून ठेवता येतील अशा शुक्राणूनाशक किंवा पुरुषबीज नाशक गोळ्या,  पुरुष नसबंदी,  स्त्री नसबंदी,  कॉपर टी, यांसारखी काही साधनं किंवा पद्धती वापरता येतात. यांना गर्भनिरोधकं असं म्हणतात.   
गर्भधारणा नक्की कशी होते, गर्भनिरोधके तसेच सुरक्षित वैद्यकीय गर्भपाताविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वरील लेख तसेच वेबसाईटवर चर्चिल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे नक्की वाचा.    

गर्भधारणा नक्की कशी होते?


https://letstalksexuality.com/contraception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 20 =