प्रश्नोत्तरेगर्भधारणा झाली आहे कि नाही हे तपासण्यासाठी कशाचा वापर करावा

2 उत्तर

मासिक पाळीचक्राच्या गर्भधारणेसाठी पूरक असलेल्या काळात, गर्भनिरोधक न वापरता लैंगिक संबंध आले असतील तर गर्भधारणा होऊ शकते. मासिक पाळीचक्राच्या नेमक्या कोणत्या काळात गर्भधारणा होते हे अनेकदा आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहे. सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/conception/.

https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

आता वळूयात तुमच्या मुख्य प्रश्नाकडे. तुम्हाला गर्भधारणा झाली असावी असे वाटत असेल तर मेडिकलमध्ये प्रेग्नंसी टेस्ट करण्यासाठी एक कीट मिळते. त्यावर दिलेल्या सूचनांचे पालन करून तुम्ही घरच्या घरी प्रेग्नंसी आहे की नाही हे बघू शकता. ही टेस्ट केल्यानंतर जर टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर एकदा डॉक्टरांकडून दिवस गेले आहेत की नाहीत याची खात्री करून घेणे कधीही चांगले.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 16 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी