प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsदिवस जाण्याविषयी

एक महिन्याची पाळी चुकलीय म्हणजे आतापर्यंत यायला हवी होती पण अजूनही आलेली नाही. चुकून दिवस गेले असण्याची शक्यता आहे. गर्भपाताबद्दल मार्गदर्शन हवंय.

राहणार- नाशिक , वय- २६ ,

इथल्या काही डॉक्टर किंवा हॉस्पिटलचे नावं सुचवू शकता का?

पाळी चुकून एक आठवडा झालाय आतापर्यंत.

लवकरात लवकर उपाय मिळावा अशी विंनती .

1 उत्तर

तुम्ही घरी प्रेग्नन्सी किटच्या सहाय्याने गरोदर आहात की नाही हे तपासून पाहा. तसेच डॉक्टरकडून प्रेग्नंसी कन्फर्म केलेली कधीही योग्य. एखाद्या फिजिशियन अथवा स्त्री रोग तज्ञ यांना प्रथम भेटा. प्रेग्नंसी कन्फर्म करा. गर्भधारणा किती दिवसांची आहे तेही तुम्हाला कळेल. प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर योग्य त्या वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भपात करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी.

कृपया वैद्यकीय सल्ल्याशिवाय इतर कोणीही सुचविलेली गोळ्या, औषधे किंवा इतर घरगुती उपाय करू नका. अशा उपायांनी खात्रीशीर गर्भपात होण्याची शक्यता कमी असते शिवाय त्याचे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी तुम्ही 9075 764 763 या मर्जी हेल्पलाईनला सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळामध्ये फोन करू शकता.

या हेल्पलाईन विषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक वरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/helpline-abortion/

गर्भनिरोधन आणि गर्भपाताविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक वर भेट द्या.

https://letstalksexuality.com/contraception/

https://letstalksexuality.com/question/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD/

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 5 =