प्रश्नोत्तरेमला दिवसातून दोन तीन वेळा हस्तमैथम करून सुद्धा मन भरत नाही मी काय करू ??

2 उत्तर

हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक निरोगी नसतो. सतत हस्तमैथुन करण्याची इच्छा निर्माण होणे देखील योग्य नाही हेही आपण हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसे जर का होत असेल तर खालील पैकी काही उपाय केले तर त्याचा तुम्हाला निश्चितच उपयोग होऊ शकेल.

• हस्तमैथुन कधी करावंसं वाटतं याचा आधी विचार करा. स्वतःला इतर कोणत्या तरी गोष्टीमध्ये गुंतवून घ्या. व्यायम करायला, खेळायला, पळायला किंवा पोहायला जा. व्यायामामुळे शरीर आणि मन दोन्ही ताजंतवानं होतं.

• मन वेगळ्या गोष्टीत रमलं की सेक्सचे किंवा हस्तमैथुनाचे विचार कमी व्हायला मदत होते. त्यामुळे एखाद्या गटामध्ये सामील व्हा. सामाजिक कामाची आवड असेल तर तशा एखाद्या कामात सहभाग घ्या. वाचनाची आवड असेल तर लायब्ररीत जाऊन पुस्तकं वाचा. मित्रांबरोबर सहलीला, बाहेर जा. सेक्सविषयी बोलणं, वाचणं, फिल्म इत्यादी पाहणं काही काळ टाळून पहा. हस्तमैथुन करण्याची इच्छा कमी होऊ शकेल.

• सुरुवात म्हणून एका दिवसात किती वेळा हस्तमैथुन करता ते कमी करा. चारदा करत असाल तर दोनदाच करा, दोनदा करत असाल तर एकदाच करा. अशा प्रकारे हळू हळू हस्तमैथुनाची सवय कमी होऊ शकेल. जर प्रयत्न करूनही जमत नसेल तर डॉक्टरांची मदत घ्यायला काहीच हरकत नाही.

• कोणाची तरी प्रत्यक्ष भेटून मदत घेता येईल. एखाद्या समुपदेशकाला भेटा. काही हेल्पलाईन नंबर्स पाठवत आहे त्याची देखील तुम्हाला मदत होईल.

हेल्पलाईन नं- 9763640480 (सोमवारी संध्याकाळी ७ ते ९ या वेळेतच फोन करा)

‘आयकॉल’ हेल्पलाईन-०२२ २५५२११११

युवकांसाठी हेल्पलाईन – ८१४९७५६७९६

स्वतःवर विश्वास ठेवा. सेक्स आणि लैंगिक भावनांमध्ये काहीही वाईट नाही. फक्त त्याच्या आहारी जाऊ नका. आणि तुम्ही यात नक्की यशस्वी व्हाल अशी आमची खात्री आहे.

आणखी मदत लागली तर आम्हाला नक्की लिहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा… काळजी घ्या…

हस्तमैथुनाविषयी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

हस्तमैथुनाविषयीचे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहेत ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 12 =