प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमासिक पाळी च्या काळात सेक्स केल्ल्यावर pregnancy चा धोका वाढतो का?
vishnu replied 8 years ago

स्त्रीच्या योनीचे वीर्य पिणे चांगले आहे का

I सोच replied 8 years ago

स्त्रीच्या योनीतून वीर्य येत नाही. लैंगिक संबंध सुखकर होण्यासाठी स्त्राव बाहेर येत असतो. तो पुरुषाला हानिकारक नसतो.

ramdas kolhe replied 8 years ago

Pn to srav purushane jibhene touch ke la v pilatr kahi problem nahi na te sanga plz answer dya

I सोच replied 8 years ago

जोडीदारांनी एकमेकांच्या लैंगिक अवयवांना जिभेने चाटणे अथवा लिंग तोंडात घेणे याला मुखमैथुन असं म्हणतात. जर दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल, दोघांनाही त्यातून आनंद मिळत असेल तर त्यात गैर काही नाही. मात्र मुखमैथुन करताना योनीचा भाग स्वच्छ असायला हवा. योनीमार्गामध्ये कधी कधी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. असा काही जंतुसंसर्ग झाला असेल तर त्यावर उपाय करावा. अशा वेळी मुखमैथुन करू नये. काही जणांना मुखमैथुन करणे किळसवाणे वाटू शकते. त्यामुळे दोन्ही जोडीदारांना यातून आनंद मिळतोय का याचा विचार करणे आवश्यक आहे. योनीतील स्राव शरीरात गेला तरी त्याने काहीही धोका पोहचत नाही.

Aarya wagh replied 8 years ago

माझ्या मैञिण ला मी मासिक पाळी च्या शेवटी संभोग केलोय…आणी ते पण निरोध चा वापर नाही केलोय आम्ही. .तर कृपया सांगा मासिक पाळी वेळेवर येत नाही..कृपया काही उपाय सांगा….

I सोच replied 8 years ago

मासिक पाळीच्या शेवटी म्हणजे किती दिवस आधी? मासिक पाळीच्या आधी एक आठवडा पर्यंत लैंगिक संबंध आले असतील तर खरंतर गर्भधारणा होण्याची शक्यता कमी आहे.

मासिक पाळीच्या चक्रामधल्या काही दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. प्रत्येक स्त्रीसाठी पाळीचं चक्र वेगवेगळं असतं. साधारणपणे पुढची पाळी येण्याच्या आधी 2 आठवड्याच्या सुमारास अंडोत्सर्जन होते. म्हणजेच स्त्रीच्या बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येते आणि बीजवाहिनीमध्ये 12-24 तास जिवंत राहते. या काळात जर पुरुष बीजाशी त्याचा संपर्क झाला तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. याविषयी अधिक माहिती खालील लेखामध्ये दिली आहे ते वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/conception/
https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

1 उत्तर

मासिक पाळीच्या चक्रामधल्या काही दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. प्रत्येक स्त्रीसाठी पाळीचं चक्र वेगवेगळं असतं. साधारणपणे पाळी येण्याच्या आधी 2 आठवड्याच्या सुमारास अंडोत्सर्जन होते. म्हणजेच स्त्रीच्या बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येते आणि बीजवाहिनीमध्ये 12-24 तास जिवंत राहते. या काळात जर पुरुष बीजाशी त्याच्या संपर्क झाला तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. या विषयी अधिक माहिती गर्भधारणा नक्की कशी होते या लेखामध्ये दिली आहे.
शक्यतो मासिक पाळी चालू असताना गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते. मात्र जर पाळीचं चक्र लहान असेल म्हणजेच जर पाळी तीन आठवड्यातच येत असेल तर कधी कधी पाळी संपता संपताच अंडोत्सर्जन होतं. त्यामुळे पाळीच्या काळात सेक्स केल्यावर गर्भधारणा होणारच नाही असं नक्की सांगता येत नाही. पाळी जर महिन्यानी किंवा त्याहून जास्त दिवसांनी येत असेल तर मात्र पाळीच्या काळाच दिवस जाण्याची शक्यता नसते.
आपलं पाळी चक्र समजून घेतलं तर कोणत्या काळात दिवस जाऊ शकतात आणि ते कसं टाळता येईल हे ठरवता येऊ शकतं. मात्र कधी कधी हे अंदाज चुकू शकतात. त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी आणखी काय उपाय करता येतात याची माहिती नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी या लेखात दिली आहे. ती नक्की वाचा.
जोपर्यंत तुम्हाला आत्मविश्वास वाटत नाही, तोपर्येत निरोध किंवा इतर गर्भनिरोधक पद्धत वापरा आणि प्रेग्नन्सी राहील का ही चिंता मनातून काढून टाका.