प्रश्नोत्तरेशीघ्रपतन
शीघ्रपतन asked 8 years ago

साधारणत: शिश्‍न योनीत घातल्या नंतर किती वेळा जोरात आत बाहेर केल्यावर विर्य पतन होते. माझे साधारणत: 25-30 वेळा केल्यावर विर्यपतन होते. यामध्ये साधारणत: 10-15 सेकंदाचाच फक्त वेळ जातो. हळु हळु आतबाहेर करताना संयम राहत नाही आणी जोरात केल्यावर तातडीने विर्यपतन होते. हे नॉरमल आहे काय? मी माझ्या पार्टनरला समाधानी करत  आहे का हे कसे ओळखावे. योनीमध्ये शिश्‍न घालण्या अगोदर वक्ष दाबतो चोखतो, योनीमध्ये हस्तमैथुन, मुखमैथुन देखील करतो. परंतु शिश्‍न योनीत घातल्यानंतर जोरातच आत बाहेर केल्यावर मला समाधान मिळते परंतु हे फार कमी वेळात होते. कृपया मार्गदर्शन करा.

1 उत्तर

सर्वप्रथम तुमच्या सोबतच तुमच्या जोडीदाराच्या लैंगिक समाधानाबद्द्ल तितकाच विचार करता याबद्दल तुमचे कौतुक. आपल्या समाजामध्ये स्त्रीला लैंगिक भावना असतात आणि तिच्या दृष्टीनेही लैंगिक सुख तितकेच महत्वाचे आहे याचा विचार खूप कमी वेळा केला जातो. आता वळूयात तुमच्या उत्तराकडे. संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते. ही अनेक पुरुषांमध्ये आढळणारी समस्या आहे आणि त्यावर निश्चितच उपाय करता येईल त्यामुळे निश्चिंत रहा.  शीघ्रपतनाविषयी सविस्तर माहितीसाठी  पुढील लिंकवर क्लिक करून लेख वाचा. https://letstalksexuality.com/premature-ejaculation/ तसेच https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/ या लिंक वरील लेखामध्ये लेखात शीघ्र वीर्यपतनावर एका तार्किक उपायाचा विचार केला गेला आहे, हा लेख नक्की वाचा. या उपायाचा फायदा होत नसेल तर योग्य त्या डॉक्टरांची अवश्य मदत घ्या.   आपण आणखी एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की, संभोग हा लैंगिक समाधानाचा एकमेव मार्ग नाही. त्यामुळे तुम्ही प्रणयक्रीडा (fore play) करता यातूनही जोडीदाराला लैंगिक समाधान मिळू शकते. पण तुमच्या जोडीदाराला लैंगिक समाधान मिळते की नाही हे समजून घेण्यासाठी मनमोकळा संवाद हवा. आवाहन तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.     तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.  

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 17 =