गर्भनिरोधकांची माहिती नसल्यामुळे आणि मुळात गर्भधारणेची आणि गर्भ टाळण्याची जबाबदारी स्त्रीची अशीच आपली धारणा असल्यामुळे काय होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. चुकीच्या जाहिराती आणि संदेशांमुळे यात अजूनच भर पडते. अनवॉन्टेड 72 या तातडीने म्हणजेच लैंगिक संबंध आल्यावर 72 तासाच्या आत वापरण्याच्या गोळ्या आहेत. कोणतंही गर्भनिरोधक न वापरता संबंध आले तर ‘इमर्जन्सीमध्ये’ वापरण्याच्या या गोळ्या गर्भनिरोधक म्हणून वापरल्या गेल्या तर त्याचे स्त्रीच्या प्रजनन संस्थेवर काही ना काही परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या गोळ्यांचा वापर थांबवा.
सर्वात आधी गर्भधारणा कशी आणि कधी होते ते समजून घ्या. https://letstalksexuality.com/conception/ त्यानंतर आणि नको असणारी गर्भधारणा कशी टाळायची यामध्ये विविध गर्भनिरोधक पद्धतींची माहिती दिली आहे ती वाचा. निरोधचा वापर कसा करायचा याची माहिती लेखात दिली आहे ती वाचा. https://letstalksexuality.com/contraception/
डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य ती गर्भनिरोधक पद्धत निवडा. सध्या मूल नको असेल तर काय करता येईल, तुमच्या पत्नीच्या शरीरावर विपरित परिणाम होणार नाहीत अशी गर्भनिरोधक पद्धत निवडता येईल.
महत्त्वाचं म्हणजे या सर्वामध्ये तुमच्या पत्नीचा सहभाग, निर्णय आणि संमती महत्त्वाची आहे. दोघं मिळून निर्णय घ्या. जोडीदार म्हणून तुम्हीही गर्भधारणा न होऊ देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ती तुम्ही घ्याल अशी आशा आहे.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा