प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsHastmaithun kelayane pimples ka yetat chehryavr

Hastmaithun ani pimples cha kahi sambandh ahe?

1 उत्तर

नाही. हस्तमैथुन आणि पिंपल्सचा काहीही संबंध नाही. शरीरात होणाऱ्या संप्रेरकांच्या बदलामुळे (hormonal changes) पिंपल्स येतात. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुन करताना कोणत्या धातूच्या, काचेच्या टोकदार वस्तू वापरल्या तर मात्र लैंगिक अवयवांना इजा होऊ शकते. ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. खरंतर हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत.हस्तमैथुनाविषयी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

हस्तमैथुनाविषयीचे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहेत ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 18 =