I need help asked 7 years ago

me 21 varshacha mulga ahe.. me 10th paryant agdi sadha ani saral hoto pn tyanantr khup bighdlo.. ata me engg last year la ahe.. mala tevapasun hasthmaithun karaychi savay ahe…

teva me jast karat navto.. pn ata matr me divsatun 3-4 vela karto.. mla kahi problem nahi pn mala ya saglyacha tras hoto.. laaj vatate swatchich.. me kay karu.. mala ya sagalyatun lavkarat lavkr baher padayche ahe.. me sex bddl khupch akarshit ahe.. maza prashnache uttar shakya titkya lavkar dya.. maza ajunahi problems baddal mala bolaych ahe..

1 उत्तर
Answer for I need help answered 7 years ago

मित्रा, तुला हस्तमैथुन करावेसे वाटणे हे अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे हस्तमैथुन करणे म्हणजे तू बिघाडला आहेस हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाक. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो हे खरं आहे. त्यामुळे हस्तमैथुनाशिवाय दुसरं काहीच सुचत नाही किंवा दुसऱ्या कशातूनच आनंद मिळत नाही अशी स्थिती असेल तर मात्र सवय कमी कर. याविषयीचे वेबसाईटवरील प्रश्न वाच.

हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत. हस्तमैथुन केल्याने लिंगामध्ये ताठरता येण्यास काहीही अडचण येत नाही.

आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘लेख’, ‘FAQ – शंका समाधान’ तसेच ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

लेख- https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

तुला आणखी जे काही प्रश्न आहेत ते अगदी मोकळेपणाने विचार. काळजी घे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 16 =