मासिक पाळीच्या चक्रामधल्या काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. प्रत्येक स्त्रीसाठी पाळीचं चक्र वेगवेगळं असतं. साधारणपणे पुढची पाळी येण्याच्या आधी 2 आठवड्याच्या सुमारास अंडोत्सर्जन होते. म्हणजेच स्त्रीच्या बीजकोषातून स्त्रीबीज बाहेर येते आणि बीजवाहिनीमध्ये 12-24 तास जिवंत राहते. या काळात जर पुरुषबीजाशी त्याचा संपर्क झाला तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. या विषयी अधिक माहिती गर्भधारणा नक्की कशी होते या लेखामध्ये दिली आहे. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://letstalksexuality.com/conception/
https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/