हस्तमैथुन asked 7 years ago

मी हस्त मैथुन

रोज करतो

परंतु

कधी कधी खूप जळजळ होते

व कधी कधी वृषण मध्ये

थोडे दुखते

1 उत्तर

हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुन करताना कोणत्या धातूच्या, काचेच्या टोकदार वस्तू वापरल्या तर मात्र लैंगिक अवयवांना इजा होऊ शकते. ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. खरंतर हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत.
जळजळ होणं किंवा वृषणामध्ये वेदना होण्याची काही वेगळी कारणं असण्याची जास्त शक्यता आहे. कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.
आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘लेख’, ‘FAQ – शंका समाधान’ तसेच ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
लेख- https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
प्रश्नोत्तरे – https://letstalksexuality.com/questions-2/

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 19 =