Masturbation Releted asked 7 years ago

हस्तमैथुन केल्यावर guilt feel का येतो उघीच केलो असा वाटत ….अस वाटू नये म्हणून काय करावं

1 उत्तर
Answer for Masturbation Releted answered 7 years ago

असं होऊ शकतं. हस्तमैथुनाविषयीचे अनेक गैरसमज आपल्या समाजात दिसून येतात. हस्तमैथुन करणे म्हणजे काहीतरी वाईट असं मनात पक्क बसलं असेल तर अपराधी वाटू शकतं. यावर उपाय म्हणजे याविषयीची शास्त्रीय माहिती मिळवणं आणि आपण काहीतरी चुकीचं करतोय ही भावना मनातून काढून टाकणं. तुम्ही काही चुकीचे करत नाहीत असं का एकदा मनात पक्क बसलं की guilt feeling आपोआपच कमी होईल.

हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुन करताना कोणत्या धातूच्या, काचेच्या टोकदार वस्तू वापरल्या तर मात्र लैंगिक अवयवांना इजा होऊ शकते. ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. खरंतर हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत.

हस्तमैथुनाविषयी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

हस्तमैथुनाविषयीचे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहेत ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 1 =