प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsmazi pali chukun 2 divas zale ahe n mla ata ch preganancy nko ahe mi kay kru???
1 उत्तर

प्रवास, मानसिक ताण तणाव किंवा औषधोपचारांमुळं मासिक पाळी चक्र मागे पुढे होवू शकतं. तुम्हाला गर्भधारणा झाली आहे अशी शंका असल्यास बाजारामध्ये मिळणार्या प्रेगनन्सी किटचा वापर करुन घरच्या घरी गर्भधारणेची चाचणी करुन घेता येईल. नको असलेली गर्भधारणा झाली असल्यास कायद्यानुसार गर्भपात करण्याची सोय दवाखान्यांमध्ये उपलब्ध असते.

हे नेहमी लक्षात ठेवा, नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ती गर्भनिरोधके वापरली गेली पाहिजेत. याचं महत्व तुमच्या जोडीदारालाही समजून सांगा.

गर्भधारणा नक्की कशी होते? याबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करुन लेख वाचा.

https://letstalksexuality.com/conception/

नको असणारी गर्भधारणा टाळण्याविषयी अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/contraception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 20 =