प्रश्नोत्तरेमहिना सोडून पाळी का येते ?

1 उत्तर

माझी पाळी फार लवकर येते किंवा माझी पाळी फार उशीराने येते अशी वाक्यं आपण नेहमी ऐकत असतो. काही जणींची  पाळी २१ -22  दिवसांनी येते तर काहींना दोन दोन महिने पाळी येत नाही. कधी कधी आजारपणात पाळी पुढे ढकलली जाते तर कधी प्रवासामुळे दगदग होऊन पाळी अपेक्षेपेक्षा लवकर येते. प्रत्येकीचं पाळीचं चक्र जसं वेगळं असतं तसंच दोन पाळी चक्रांमध्ये पण फरक पडू शकतो. प्रत्येकीच्या शरीराची आणि पाळीच्या चक्राची गती वेगळी असते. कोणाची  पाळी ३०-३१ दिवसांनी येते तर कोणाची  पाळी बरेचदा ४० दिवसांनी येते. एखादीची  पाळी कधी चार आठवड्यांनी येते तर कधी कधी पाच आठवड्यांनी येते. कोणाची  पाळी २१ दिवसांनी येते. पाळीचक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्वाची घटना असते. एकदा का बीज बीजकोषातून बाहेर आलं आणि गर्भधारणा झाली नाही तर त्यानंतर साधारणपणे १२ -१६  दिवसांनी पाळी सुरू होते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधीचा काळ मात्र निश्चित असतोच असं नाही. तो बदलू शकतो. प्रवास, मानसिक ताण, औषधोपचार अशा विविध कारणांमुळे हा काळ कमी किंवा जास्त होऊ शकतो. मात्र अंडोत्सर्जन झाल्यानंतर मात्र १६  दिवसात पाळी येते. त्यामुळे लवकर का उशीरा यापेक्षाही आपलं स्वतःचं पाळीचं चक्र कसं आहे ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं.

याविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील खालील लिंक वरील लेख नक्की वाचा.
https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/
https://letstalksexuality.com/menstrual-cycle/

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 2 =