प्रश्नोत्तरेmi divsatun don vela hastmaithun karto tyache kay parinam hotat ka

1 उत्तर

हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक निरोगी नसतो. सतत हस्तमैथुन करण्याची इच्छा निर्माण होणे देखील योग्य नाही हेही आपण हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसे जर का होत असेल तर आपले लक्ष दुसऱ्या क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न करा. वाचन करा, जर आपण विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करा, खेळांमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करा.

आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘लेख’, ‘FAQ – शंका समाधान’ तसेच ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

लेख- https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 14 =