प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsPali lavakr yaavi mhanun gharguti (home) upay sanga.

1 उत्तर

पाळी लवकर येण्यासाठी किंवा उशीरा येण्यासाठी कोणतेही घरगुती उपाय नाहीत. पाळी चक्रामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी मेंदू आणि अंडकोषांमधल्या संप्रेरकांवर आणि शरीरात घडणाऱ्या इतर प्रक्रियांवर अवलंबून असतात. अंडोत्सर्जन झाल्यावर म्हणजेच अंडकोषातून बीज बाहेर आल्यावर साधारणपणे 12-16 दिवसांनी पाळी सुरु होते. या घटना आपल्या हातात नाहीत. त्यामुळे त्यावर घरच्या घरी काही उपायही करता येत नाहीत.
पाळी लवकर यावी असं तुम्हाला का वाटतंय? अनेकदा घरात सण समारंभ, पूजा, लग्न असतील तर त्या काळात पाळीची ‘कटकट’ नको असा विचार केला जातो. किंवा ट्रिप, ट्रेकला जायचंय तेव्हा प्रवासात पाळीचा त्रास नको म्हणूनही पाळी पुढे ढकलण्यासाठी किंवा आधी येण्यासाठी काय करता येईल याची विचारणा केली जाते. पाळी ही कटकट नाही, इतर शारीरिक प्रक्रियांसारखीच पाळी ही देखील नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे. योग्य काळजी घेतली आणि पाळीविषयी वाटणारी घाण मनातून काढून टाकली तर इतर अनेक गोष्टींवर जास्त लक्ष देता येईल.

sandip tayde replied 8 years ago

majhya wife la pali aali pn ekch dag aala tya nanter kahich nahi as ka …

vidya replied 8 years ago

tin manth barobar ali ya mahiyant nahi ali ka hi uyay sanga mase f/p opretion sale aahi

Darshana replied 8 years ago

Mala 10 mahine zale pali yet nahi. Tar plz jara tyavar kahi upay sanga

mona replied 8 years ago

Mazhi pali 17 divs let zale tar ti yenya sathi mi kay karu

prajakta Rane replied 8 years ago

Maz Lagan ahe Ata 26la ani mazi Date ahe 25tr pudhy janayasathi Ky karu

I सोच replied 8 years ago

मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीराची अगदी नैसर्गिक क्रिया असूनही पाळीच्या काळात बाईला अपवित्र मानलं जातं. आज 2016 सालीदेखील किती तरी मुली आणि बायकांना पाळीच्या काळात बंधनं सहन करावी लागतात. स्वयंपाक करायचा नाही, देवळात जायचं नाही, देवपूजा करायची नाही, तुळशीला पाणी घालायचं नाही, लोणच्याला हात लावायचा नाही, पापड करायचे नाहीत… एक ना अनेक. आणि सर्वच जाती-धर्मामध्ये काही ना काही प्रमाणात ही बंधनं घातलेलीच आहेत. गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित असा फारसा फरकही दिसत नाही.
खरं तर सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे की पाळीचं रक्त स्त्रीच्या शरीरातच तयार होतं आणि जर गर्भ राहिला तर त्या रक्तावरच त्याचं पोषण होतं. मग हे रक्त खराब, विटाळ कसं बरं असेल? बाईला पाळी येणं ही श्वसन, पचन किंवा रक्ताभिसरणासारखीच एक अत्यंत नैसर्गिक अशी क्रिया आहे. ती घाण नाही, अपवित्र नाही आणि तिचा इतरांवर कसलाही परिणाम होत नाही. पाळीच्या काळात जी शिवताशिवत केली जाते त्यामुळे मुलींच्या मनात स्वतःच्या शरीराविषयी नकोशी भावना तयार होते.
एखादी पूजा आहे, सण समारंभ आहे, लांबच्या प्रवासाला जायचंय, टे्रकिंग करायचंय म्हणून गोळ्या घ्यायच्याआणि पाळी लांबवायची असं अनेकजणी करतात.मात्र त्यामुळे आरोग्यावर कायमचा दुष्परिणाम होऊ शकतो.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आरोग्यावर या गोळ्यांचे काय घातक परिणाम होतील हे स्वत:ला तर पटवून द्यावंच पण आपल्या नातेवाईक महिलांनाही ते सांगावं. अर्थात शांतपणे. कुठलाही वाद न घालता. गरज असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊन वडीलधाऱ्यांची समजूत घालण्याचं काम करू शकतो.
बाईला पाळी येणं ही श्वसन, पचन किंवा रक्ताभिसरणासारखीच एक अत्यंत नैसर्गिक अशी क्रिया आहे. ती घाण नाही, अपवित्र नाही आणि तिचा इतरांवर कसलाही परिणाम होत नाही. काहीजणींना पाळीच्या काळात ओटीपोटात दुखणे, कंबर दुखणे किंवा पाय दुखणे यांसारखा त्रास होतो. चालणे किंवा एखादा दुसरा हलका व्यायाम केला तर स्नायूंना आराम मिळतो. वेदना थांबवण्यासाठी शेकही घेऊ शकता. पाळीतील वेदना सहन न करता त्यावर काही उपाय करायला हवा. खालील काही घरगुती उपाय करता येतील.
• गरम पाण्याची पिशवी कमरेखाली घ्यावी.
• आले घालून चहा प्यावा. एक कप चहात अंगठ्याएवढे आले घालावे.
• चिंचोक्याइतका चुना व त्यात दुप्पट गूळ घालून गोळी तुपातून किंवा ताकातून घ्यावी.
• बऱ्याच वेळा बद्धकोष्ठतेमुळे पोटात दुखू शकते. त्यासाठी पाळीच्या आधी भरपूर पाणी व तंतुमय पदार्थांचा उपयोग करून बद्धकोष्ठता टाळावी.
स्वतःपासूनच सुरुवात करूयात. पाळीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलूया…
लग्नाच्या निमित्ताने हा संकल्प नक्की करा…
तुम्हाला आनंदी वैवाहिक जीवनासाठी कोटी कोटी सदिच्छा !!!

I सोच replied 8 years ago

तुम्ही तुमचं वय कळवलं असतं तर उत्तर द्यायला मदत झाली असती. तुमच्या प्रश्नावरून असं वाटतंय की, तुम्हाला १० महिन्यातून एकदाच पाळी येते. असं किती वर्षे होतंय? गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.
आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.
काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.
टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

वयाच्या 45-50च्या आसपास कधी कधी त्याहीनंतर स्त्रीचं पाळीचक्र थांबतं. याचं साधं कारण म्हणजे बीजकोषात बीजं तयार होणं थांबतं. प्रोजस्टेरॉनची निर्मिती पूर्णपणे थांबते. थोड्या फार प्रमाणात इस्ट्रोजन मात्र तयार होत राहतं.

पाळी जाण्याचा काळ काही महिने ते काही वर्षं इतका असू शकतो. शेवटच्या मासिक चक्राच्या आधीचा आणि नंतरचा काळ म्हणजे पाळी जाण्याचा काळ. पाळी जाण्याआधी काही वर्षं ती अनियमित होऊ शकते. काही जणींची पाळी चक्रं लहान होऊ लागतात तर काही जणींच्या दोन चक्रात बरंच अंतर पडतं. काही जणींचे पाळीचे दिवस आणि रक्तस्राव कमी होतो तर काही जणींना जास्त दिवस, गाठीयुक्त आणि जास्त रक्तस्राव होऊ शकतो. या काळात सलग एक वर्ष पाळी आली नाही तर पाळी गेली असं समजायला हरकत नाही.

प्रेगा टेस्ट करून गर्भधारणा आहे की नाही ते ठरवता येईल. प्रेगा टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर डॉक्टर कडून प्रेग्नंसी कन्फर्म केलेली कधीही चांगले. गर्भधारणा नसेल तर गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.

आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.

काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.

अधिक माहितीसाठी– https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.

टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

meghna kadam replied 8 years ago

Pali pude jaycha upay sanga plz…

I सोच replied 8 years ago

तुम्हाला पाळी का लांबवायची आहे ? मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीराची अगदी नैसर्गिक क्रिया असूनही पाळीच्या काळात बाईला अपवित्र मानलं जातं. आज 2016 सालीदेखील किती तरी मुली आणि बायकांना पाळीच्या काळात बंधनं सहन करावी लागतात. स्वयंपाक करायचा नाही, देवळात जायचं नाही, देवपूजा करायची नाही, तुळशीला पाणी घालायचं नाही, लोणच्याला हात लावायचा नाही, पापड करायचे नाहीत… एक ना अनेक. आणि सर्वच जाती-धर्मामध्ये काही ना काही प्रमाणात ही बंधनं घातलेलीच आहेत. गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित असा फारसा फरकही दिसत नाही.

खरं तर सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे की पाळीचं रक्त स्त्रीच्या शरीरातच तयार होतं आणि जर गर्भ राहिला तर त्या रक्तावरच त्याचं पोषण होतं. मग हे रक्त खराब, विटाळ कसं बरं असेल? बाईला पाळी येणं ही श्वसन, पचन किंवा रक्ताभिसरणासारखीच एक अत्यंत नैसर्गिक अशी क्रिया आहे. ती घाण नाही, अपवित्र नाही आणि तिचा इतरांवर कसलाही परिणाम होत नाही. पाळीच्या काळात जी शिवताशिवत केली जाते त्यामुळे मुलींच्या मनात स्वतःच्या शरीराविषयी नकोशी भावना तयार होते.

एखादी पूजा आहे, सण समारंभ आहे, लांबच्या प्रवासाला जायचंय, टे्रकिंग करायचंय म्हणून गोळ्या घ्यायच्याआणि पाळी लांबवायची असं अनेकजणी करतात.मात्र त्यामुळे आरोग्यावर कायमचा दुष्परिणाम होऊ शकतो.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आरोग्यावर या गोळ्यांचे काय घातक परिणाम होतील हे स्वत:ला तर पटवून द्यावंच पण आपल्या नातेवाईक महिलांनाही ते सांगावं. अर्थात शांतपणे. कुठलाही वाद न घालता. गरज असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊन वडीलधाऱ्यांची समजूत घालण्याचं काम करू शकतो.

बाईला पाळी येणं ही श्वसन, पचन किंवा रक्ताभिसरणासारखीच एक अत्यंत नैसर्गिक अशी क्रिया आहे. ती घाण नाही, अपवित्र नाही आणि तिचा इतरांवर कसलाही परिणाम होत नाही. काहीजणींना पाळीच्या काळात ओटीपोटात दुखणे, कंबर दुखणे किंवा पाय दुखणे यांसारखा त्रास होतो. चालणे किंवा एखादा दुसरा हलका व्यायाम केला तर स्नायूंना आराम मिळतो. वेदना थांबवण्यासाठी शेकही घेऊ शकता. पाळीतील वेदना सहन न करता त्यावर काही उपाय करायला हवा. खालील काही घरगुती उपाय करता येतील.

• गरम पाण्याची पिशवी कमरेखाली घ्यावी.

• आले घालून चहा प्यावा. एक कप चहात अंगठ्याएवढे आले घालावे.

• चिंचोक्याइतका चुना व त्यात दुप्पट गूळ घालून गोळी तुपातून किंवा ताकातून घ्यावी.

• बऱ्याच वेळा बद्धकोष्ठतेमुळे पोटात दुखू शकते. त्यासाठी पाळीच्या आधी भरपूर पाणी व तंतुमय पदार्थांचा उपयोग करून बद्धकोष्ठता टाळावी.

स्वतःपासूनच सुरुवात करूयात. पाळीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलूया…

pillu replied 8 years ago

agodhar pale barobar partek mahenyla yayche pan ata hyach mahenayt ale nahe kay ajar zala mhanayche

smita chaoudhari replied 8 years ago

4 mahine zale mc ali nahi ahe ani vy ahe 26 year ani bemvhikahi pot vadhat chhlel ahejhlk hlk atmdhae dukt upauy suchva

I सोच replied 8 years ago

टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.गर्भधारणा किंवा इतर काही कारणांमुळे मासिक पाळी अनियमित येऊ शकते त्याविषयी या उत्तरामध्ये माहिती देत आहे.

लैंगिक संबंध जर पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजेच जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात गर्भनिरोधक न वापरता आले असतील, तर गर्भधारणा होऊ शकते. (स्त्रीच्या पाळीचक्रातील जननक्षम काळ ओळखण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ हा लेख वाचा.)
गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.
आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.
काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.

suvarna more replied 8 years ago

mazi pali Deat 11tarikh aahe pan mala pali lavkar yenyeasathi kahi gharguti upay?

I सोच replied 8 years ago

पाळी लवकर येण्यासाठी किंवा उशीरा येण्यासाठी कोणतेही घरगुती उपाय नाहीत. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील प्रश्नाचे उत्तर वाचा.
https://letstalksexuality.com/question/pali-lavakr-yaavi-mhanun-gharguti-home-upay-sanga/
याविषयावरचा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/medicines-for-delaying-menstruation/

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 9 =