प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsSex kartana jar male ne virya baher takal tar pregnancy hou shakte ka?

Sex kartana jar male ne virya baher takal tar pregnancy hou shakte ka?

1 उत्तर
Answer for preagnancy tips answered 8 years ago

सेक्स किंवा संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर बाहेर टाकले  तरीही वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने  म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील  असते. त्यामुळे जर स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात सेक्स केला तर  गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे. गर्भधारणा आणि गर्भ निरोधाकांविषयी अधिक माहितीसाठी या लिंक वरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/conception/ https://letstalksexuality.com/contraception/

 

आवाहन

तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.

 

तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 11 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी