जे पाण्यासारख विर्य बाहेर येत त्याने मुलगी प्रेग्नेंट होऊ शकते का….? प्रेग्नेंट हिण्यासाठी किती विर्य आत जण गरजेचंअसत
गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीच्य वीर्य योनीमार्गातून गर्भाशयात जाणं आवश्यक आहे. तेही मासिक पाळी चक्राच्या गर्भधारणेस पूरक असणाऱ्या काळात. गर्भधारणेस पूरक काळ ओळखण्यासाठी खालील लिंकवरील ’गर्भधारणा कशी होते’ हा लेख वाचा. https://letstalksexuality.com/conception/.
एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. गर्भधारणेसाठी पूरक असणाऱ्या काळात जर थोडे जरी वीर्य आत गेले तरी गर्भधारणा होऊ शकते.
गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे. गर्भ निरोधकांविषयी अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/contraception/ या लिंक वरील लेख वाचा.