एकदा सेक्स केला तरी प्रेग्नंट राहू शकते. कारण लैंगिक संबंधांदरम्याल जेव्हा पुरुषाचं लिंग ताठर झाल्यावर स्त्रीच्या योनीमध्ये प्रवेश करतं तेव्हा एका क्षणी लिंगामधून वीर्य बाहेर येतं. या वीर्यामध्ये लाखोंच्या संख्येने पुरुष बीजं असतात. ती पोहत पोहत बीजवाहिन्यांच्या दिशेने प्रवास करू लागतात. बीजवाहिनीमध्ये तेव्हा स्त्री बीज असेल तर एक पुरुष बीज स्त्रीबीजामध्ये शिरतं आणि त्यातून फलित गर्भ तयार होतो. हा फलित गर्भ पुढील १० दिवसांमध्ये पुढे सरकत येतो आणि गर्भाशयाच्या भिंतीवर रुजतो. ही सर्व प्रक्रिया निर्धोकपणे पार पडली तर गर्भधारणा झाली असं म्हणता येईल.
पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.