प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsशिश्न योनीत पूर्ण जात नाही, काय करावे?

1 उत्तर
Answer for sex answered 6 years ago

शिश्न योनीत पूर्ण न जाण्यामागे खूप वेगवेगळी कारणे असू शकतात. जोडीदाराची संभोग करण्याची पहिलीच वेळ असणे, योनीपटलाचे (Hymen) विच्छेदन झालेले नसणे. तसेच जोडीदाराशी संवाद नसणे त्यामुळे आपल्या जोडीदाराशी बोला. संवाद वाढवा. त्यांना कशाचा त्रास होतो ते पहा आणि मग त्यावर उपाय शोधा. लिंगप्रवेशी संबंधात अनेकदा घर्षणातून वेदना होतात. खरंतर योनी मार्गातून येणाऱ्या स्त्रावांमुळे संबंध सुखकर होत असतात. पण इच्छा नसणे, पुरेशी उत्तेजना न मिळणे या कारणामुळे हे स्त्राव तयार होत नाहीत आणि वेदना होतात. आनंददायी लैंगिक संबंधासाठी खाजगी जागा, निवांतपणा, स्वच्छता, इच्छा, तणावरहित मन, प्रेम, पुरेशी जवळीकता या अत्यावश्यक गोष्टीसोबतच फोर प्ले (जवळ घेणे, चुंबन, बातचीत, स्पर्श, मिठी ई) ह्या घटकांना कमालीचे महत्व आहे. तुम्ही या फोर प्लेसाठी किती वेळ देता? नसेल तर तसा वेळ द्या आणि पहा.. अन तरीही जर होणारा त्रास कमी नाही झाला तर स्त्रीरोग तज्ञांना भेटा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 19 =