प्रश्नोत्तरेसेक्स करताना शीघ्र पतन होते

1 उत्तर

शीघ्रपतन होण्यास अनेक कारणे आहेत. खूपदा वाढत्या वयोमानानुसार लिंगातील ताठरतेवर परिणाम होतो. शिवाय आजकालच्या धावत्या युगात मानसिक अस्वास्थ्यामुळे देखील असे होऊ शकते. अतिरिक्त मद्य सेवन किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यसनामुळेदेखील हे होऊ शकते.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे सेक्स म्हणजे केवळ योनी मध्ये लिंग घालणे नाही. सेक्सचे अनेक पैलू आहेत ज्यातील एक महत्वाचा पैलू आहे फोरप्ले किंवा प्रणय. यातून देखील आपल्याला व आपल्या पार्टनरला शारीरिक आनंद मिळू शकतो. त्यातून आपण एकमेकांबद्दल, एकमेकांच्या शरीराबद्दल खूप गोष्टी जाणू शकतो शिवाय एकमेकांच्या शरीरातील कोणते भाग संवेदनशील आहेत, कोणत्या भागांमुळे आपल्या लैंगिक भावना तीव्र होतात या गोष्टी जाणून घेण्यासाठी फोरप्ले अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतो. त्यामुळे लिंगातील शीघ्र पतनाबद्दल चिंता करणे सोडून द्या. आपले मन शांत ठेवा, क्रियाशील कामांमध्ये मन गुंतवा, आपल्या पार्टनरला विश्वासात घ्या व बोलून समस्या सुटते का ते पहा. अनेकदा शीघ्रपतनाच्या टेन्शनमुळे सेक्समधला बाकी रस कमी होतो व पूर्ण लक्ष त्या एका गोष्टीवरच केंद्रित होतं.

लवकर वीर्यस्खलन होण्याची अनेक कारणं असू शकतात. सर्व प्रथम म्हणजे वयोमानानुसार लैंगिक इच्छा कमी होऊ शकतात ज्याचा परिणाम म्हणून लिंगाच्या नसा ढिल्या होणे किंवा लवकर वीर्यस्खलन होणे अशा गोष्टी होऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लैंगिक समागमाच्या वेळी आपली मानसिक अवस्था कशी आहे त्यावरही लिंगाचा ताठरपणा किंवा वीर्यस्खलनाचा कालावधी अवलंबून असू शकतो. आजच्या धकाधकीच्या काळात, जिथे आपल्यावर अनेक गोष्टींचा दबाव असतो, आपली मानसिक अस्वस्थता आपल्या पर्सनल व प्रायवेट गोष्टींवर खूप प्रभाव टाकत असते ज्यातील एक भाग म्हणजे आपण आपल्या पार्टनरबरोबर कशा पद्धतीने वागतो. त्यामुळे सर्वात प्रथम आपण या समस्येबद्दल आपल्या पार्टनरला विश्वासात घ्या, त्यांच्याशी बोला व असं होण्याची कारणे आपल्या नात्यात आलेल्या तणावात आहेत का? याचा मागोवा घ्या.
 
लैंगिक समस्यांवर बाजारामध्ये अनेक औषधे उपलब्ध आहेत परंतु खातरजमा केल्याशिवाय अशा औषधांचा वापर करणे घातक ठरू शकते त्यामुळे आपण योग्य वैद्यकीय मदत घेणे योग्य ठरेल. शक्यतो तुमच्या डॉक्टरांशी किंवा सेक्सॉलॉजिस्टशी बोला. ते तुम्हाला अधिक मदत करू शकतील.
 
त्यामुळे चिंता करणे सोडा, शांत व्हा, आपल्या पार्टनरला विश्वासात घ्या, romantic गोष्टींमध्ये मन रमवा, फोरप्लेवर जोर द्या आणि तरीही जर आपली समस्या दूर होत नसेल तर न लाजता sexologist ची मदत घ्या.
https://letstalksexuality.com/premature-ejaculation/ तसेच https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/ या लिंक वरील लेखामध्ये लेखात शीघ्र वीर्यपतनावर एका तार्किक उपायाचा विचार केला गेला आहे, हा लेख नक्की वाचा.
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.  
 
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.
 
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 19 =