लैंगिक अधिकार
लैंगिक अधिकार
लैंगिक संबंध आणि नाती, लैंगिक अभिव्यक्ती, निवड अशा सर्व बाबी लैंगिकतेशी संबंधित आहेत. आता काही प्रश्न पाहू या.
- आपले कुणाशी लैंगिक संबंध आले तर ते आपल्या मर्जीने झाले का जबरदस्तीने?
- आपल्या जोडीदाराचं आपल्याशी असलेलं लैंगिक वर्तन सुखद आहे का हिंसक?
- मला इतक्यात लग्न करायचं नाही. पण घरचे लोक माझं काहीच ऐकत नाहीत.
- माझ्या अंगावरून जातंय् पण का ते मला कळत नाहीये.
- मला कंडोम वापरायचा आहे. तो महा सहज उपलब्ध होतो का?
- माझे आणि माझ्या मित्राचे संबंध आले आहेत आणि मला बहुतेक दिवस गेले आहेत. मला गर्भपात करायचा आहे. पण आमचं लग्न झालेलं नाही. मी आता काय करू?
- मला इतक्यात मुलं नको आहेत. मला पाळणा लांबवण्यासाठी काही गर्भनिरोधकं वापरता येतील का?
या आणि अशा इतरही सगळ्या प्रश्नांचा, लैंगिक संबंधांचा आणि वर्तनाचा आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. लैंगिक आरोग्य चांगलं राहणं आणि त्यासंबंधीच्या समस्यांसाठी योग्य माहिती मिळणं महत्त्वाचं आहे. लैंगिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला काही अधिकार असणं आणि त्यांचं संरक्षण होणं आवश्यक आहे.
लैंगिक अधिकार म्हणजे नक्की कोणते अधिकार? जे प्रत्येकाला आहेत.
- कोणताही भेदभाव, जबरदस्ती किंवा हिंसेशिवाय पुढील अधिकार मिळणं
- उत्तम प्रतीच्या लैंगिक आणि प्रजनन आरोग्याच्या सेवा मिळण्याचा अधिकार
- लैंगिकतेबद्दल शास्त्रीय माहिती मिळवण्याचा आणि देण्याचा अधिकार
- शरीराचा आदर
- जोडीदार निवडीचा अधिकार
- लैंगिक क्रिया करायची का नाही हे ठरवण्याचा अधिकार परस्पर संमतीने लैंगिक संबंध
- संमतीने विवाह
- मुलं हवीत का नकोत, किती आणि कधी हे ठरवण्याचा अधिकार
- समाधानकारक, सुरक्षित आणि सुखकारक लैंगिक आयुष्य जगण्याचा अधिकार
लैंगिक आणि प्रजनन अधिकार हे मानवी अधिकार आहेत हे १९९४ साली कैरो इथे भरलेल्या जागतिक परिषदेने मान्य केलं आहे. प्रत्येक व्यक्तीला हे अधिकार आहेत. त्या व्यक्तीच्या शिक्षणाशी, आर्थिक परिस्थितीशी, ती स्त्री आहे का पुरुष याच्याशी किंवा ती समलिंगी आहे की भिन्नलिंगी याचा या हक्कांवर काहीही परिणाम होत नाही. प्रत्येक मानवाला हे अधिकार आहेत. मात्र समाजात होणाऱ्या भेदभावांचा परिणाम कुणाला हे हक्क मिळतात आणि कुणाला नाही याच्यावर होतो.
Its very helpful
Thanks a lot
निवडीचा अधिकार हा एक नैसर्गिक अधिकार आहे
अगदी बरोबर… तुमच्या मताशी सहमत आहे…
तुमच्या प्रतिक्रिया कळवत जा.