काही गर्भनिरोधक, जसे की गोळी, पॅच आणि इंजेकशनद्वारे घेतली जाणारी काही औषधे बिजांडकोशातून बीज किंवा बिजांड बाहेर सोडण्यापासून रोखतात. या प्रकारच्या गर्भनिरोधकांसाठी डॉक्टरांना भेटणे आणि प्रिस्क्रिप्शन घेणे आवश्यक आहे. या गर्भनिरोधनाच्या पद्धती नको असणारी गर्भधारणा रोखण्यासाठी खूप प्रभावी आहेत. परंतु या पद्धतींमुळे लिंगसांसर्गिक आजारांचा संसर्ग रोखला जाऊ शकत नाही म्हणूनच गर्भधारणा आणि लिंगसांसर्गिक आजार टाळण्यासाठी या पद्धतींसोबतच कंडोम वापरणे हा उत्तम मार्ग आहे.
No Responses