लिंग सांसर्गिक आजार किंवा STD हे एका व्यक्तीला असतील तर तिच्याकडून दुसऱ्या व्यक्तीला लैंगिक संबंधातून होऊ शकतात. म्हणजे शिश्न, वृषण, योनी किंवा योनीबाहेरचा भाग यांचा दुसऱ्या व्यक्तीशी ओरल सेक्स, एनल सेक्स किंवा व्हजायनल सेक्समधून थेट संपर्क झाला तर. काही प्रकारचे लिंगसांसर्गिक आजार खूप प्रमाणात आढळतात. हे आजार झाले तर त्यामध्ये लाज वाटून घेण्याची काही गरज नाही. काही लिंगसांसर्गिक आजारांमध्ये कोणतीच लक्षणं दिसत नाहीत.आपल्याला आजार आहे याची कल्पनाही खूप लोकांना नसते. मात्र लैंगिक संबंधातून ते पसरत राहू शकतात. लिंग सांसर्गिक आजारांची लक्षणे, त्यासाठीच्या चाचण्या आणि लिंग सांसर्गिक आजारांचा संसर्ग होऊ नये याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडिओ पहा.
No Responses