शरीरप्रतिमा म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
शरीरप्रतिमा म्हणजे तुम्ही जसे दिसता त्याबद्दलचं तुमचं स्वतःचं मत आणि टीव्हीवर, मासिकं, सिनेमे आणि जाहिरातींमध्ये दिसणाऱ्या इतर प्रतिमांशी स्वतःची केली जाणारी तुलना. खरंतर फार थोड्या प्रकारची शरीरं आपल्या डोळ्यांसमोर पुन्हापुन्हा येत असतात, त्यामुळे आपला समज होतो की स्त्रियांसाठी एक आणि पुरुषांसाठी एक अशी दोनच प्रकारची शरीरं असायला पाहिजेत आणि स्वतःच्या शरीराची त्यांच्याशी तुलना करता तुम्हाला सारखं वाटतं की कितीही केलं तरी तुम्ही कमीच पडता आहात. खरंतर तुम्ही आज जे आदर्श शरीर मानता त्याची संकल्पनासुद्धा सारखी बदलत असते!
सोबतचा व्हिडिओ पहा ज्यात तुम्ही सकारात्मक स्वप्रतिमेबद्दल जाणून घ्याल आणि तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल चांगले वाटेल कारण ते एकमेवाद्वितीय आहे अगदी तुमच्यासारखेच!
No Responses