प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुली सोबत कसा सेक्स करावा?
1 उत्तर

संभोग करणं ही एक जबाबदार कृती आहे. यामध्ये सहभागी असणार्‍या व्यक्तींचं संमंती योग्य वय आणि संमंती असणं आवश्यक आहे.
संभोगामध्ये अनेक प्रकारच्या लैंगिक कृती समाविष्ट असतात. जोडीदाराच्या संमंतीनं आणि आवडीनुसार त्या त्या कृती करणं आवश्यक असतं. त्यातील काही कृती खालीलप्रमाणे
१. हस्तमैथुन: जोडीदार एकमेकांच्या लैंगिक अवयवांना कुरवाळून(हस्तमैथुन करुन) लैंगिक सुख देऊ शकतात. ही एक सुरक्षित लैंगिक कृती आहे. यामध्ये गर्भधारणेचा धोका नसतो. मुली हस्तमैथुन कशा करतात याबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

२. लिंग-योनी संभोग: यामध्ये पुरुषाचं लिंग स्त्रीच्या योनीमध्ये सरकलवलं जातं. जोपर्यंत वीर्यपतन किंवा परमोच्च लैंगिक सुख मिळत नाही तोपर्यंत अशा प्रकारे संभोग केला जातो. या कृतीमध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता असते.ही कृती प्रजोत्पादनासाठी महत्वाची असते. गर्भधारणा नक्की कशी होते याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

गर्भधारणा नक्की कशी होते?


नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/contraception/

३. मुखमैथुन: मुखमैथुनामध्ये स्त्री किंवा पुरुष जोडीदाराच्या लैंगिक अवयवांना मुखाने म्हणजेच तोंडाने स्पर्श करून सुख देतात. पुरुषाचे लिंग जोडीदार तोंडात धरते किंवा स्त्रीच्या योनिला, क्लिटोरिसला तोंडाने, जिभेने स्पर्श करून उत्तजना निर्माण केली जाते.

४. गुदामैथुन: गुदामैथुन म्हणजे गुदद्वारामार्गे लिंगप्रवेश करणे. पुरुष स्त्री किंवा पुरुष जोडीदाराच्या गुदद्वारामध्ये आपले लिंग सरकवतो. गुदामैथुनामध्ये कधी कधी गुदद्वाराला आतमध्ये जखमा होण्याची शक्यता असते. योनिमार्गासारखे गुदद्वाराचे स्नायू लवचिक नसल्याने तिथे इजा होऊ शकतात. यासाठी चांगल्या प्रकारचे वंगणयुक्त जेलसारखे पदार्थ वापरणं उपयोगी ठरतं.

संभोग करण्याच्या प्रत्येकाच्या पध्दती आणि कारणं वेगवेगळी असू शकतात. प्रजोत्पादनासाठी आणि लैंगिक सुखासाठी मुख्यतः संभोग केला जातो. या दोन्ही प्रकारच्या संभोगामध्ये लैंगिक अवयवांची स्वच्छता असणं फार महत्वाचं असतं. तुम्ही जोडीदाराच्या कलेकलेने आणि संमंतीने वेगवेगळ्या लैंगिक कृती करु शकता. जोडीदाराला कशामुळं जास्त आनंद मिळतो या गोष्टी लक्षात असतील तर फायदा होतो. शिवाय एच.आय.व्ही किंव लिंगसांसर्गिक आजार टाळण्यासाठी योग्य साधनं वापरणं आवश्यक आहे. याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी वेबसाईटच्या डाव्या बाजूला असलेल्या लैंगिक आरोग्य विभागामध्ये अधिक माहिती वाचता येईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 8 =