प्रश्नोत्तरेपाळी येण्याच्या सहा दिवस अगोदर सेक्स केला आहे, तर ती गरोदर राहिल का?

1 उत्तर

पाळीच्या सहा दिवस अगोदर लैंगिक संबंध आले असतील तर गर्भधारणा होण्याची शक्यता कमी आहे, पण नाकारता येत नाही.

खरंतर गर्भ राहू शकतो का? हे स्त्रीच्या मासिक पाळीचक्रावर अवलंबून असते. पाळीचक्र जर खूप लहान किंवा खूप मोठे असेल तर कधीकधी पाळी संपता संपता गर्भधारणा होऊ शकते. म्हणून कमी शक्यता असते पण शक्यता नाकारता येत नाही. पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. प्रत्येकाच्या पाळीचक्रानुसार हा काळ वेगळा असू शकतो. बऱ्याच जनांचा असा समज असतो की अंडोत्सर्जन हे १४ व्या दिवशीच होतं. पण बहुतेक वेळा ते लवकर किंवा उशिराही होत असतं. लवकरात लवकर म्हणजे अगदी ७ व्या दिवशीही अंडोत्सर्जन होऊ शकतं.

याविषयी अधिक माहिती खालील लेखामध्ये दिली आहे ते वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/conception/

https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

त्यामुळे पाळीचक्रात गर्भधारणा होणारच नाही असा कुठलाच अचूक सांगता येईल असा काळ नसतो. त्यामुळे नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ते गर्भनिरोधक वापरणे गरजेचे आहे. तसेच जोडीदाराबरोबर याविषयी चर्चा करून दोघांच्या संगनमताने कोणते गर्भनिरोधक वापरायचे हे ठरवले पाहिजे. शिवाय आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे. ‘नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी’ या वेबसाईटवरील लेखातून तुम्हाला अधिक माहिती मिळेल. खाली लिंक दिली आहे. https://letstalksexuality.com/contraception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 0 =