प्रश्नोत्तरेCategory: Private Questionसेक्स ची भीती वाटतेय.

मी गेल्या २ वर्षांपासून relation मध्ये आहे,पण आमच्यात सेक्स कधीच झाला नाही. झालं ते फक्त kissing etc… आम्हा दोघांनाही सेक्स चा अनुभव नाही, पुढच्या वर्षी आमचा लग्न करायचा विचार आहे पण मलाच भीती वाटते की मी माझ्या पार्टनरला लैंगिकदृष्ट्या खुश ठेऊ शकेल की नाही? मनात खूप अनावश्यक विचार येतात, ती मला सोडून तर नाही ना जाणार? Etc,etc… सांगायचं झालं तर मला सेक्स करायची खूप भीती वाटते. मला करता येईल का? केला तर पार्टनर संतुष्ट होईल की नाही? असल्या विचारांमुळे लाईफ स्टॉप झाल्यासारखी झालीय.

Ashu replied 2 years ago

during sex no ejaculation
No maintain erection

let's talk sexuality replied 2 years ago

नमस्कार,
तुमचा प्रश्न समजला नाही, तुम्ही मराठीमध्ये सविस्तरपणे https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंकवर नोंंदवू शकता.

1 उत्तर

बरं केलंत प्रश्न विचारला ते. आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधायला सुरुवात करणंसुद्धा फार महत्वाचं असतं.

तुम्ही म्हणता त्या प्रमाणे तुम्ही दोन वर्षे एकमेकांसोबत आहात, प्रेम करता, कमिटेड आहात. लग्नाचाही विचार करत आहात. एकमेकंना ओळखण्यासाठी, जाणून घेण्यासाठी हा मोठा काळ आहे. त्यामुळे खात्री बाळगा, अशा एखाद्या गोष्टीमुळे लगेच कोणी कोणाला सहसा सोडून जाता नाही. एक गोष्ट मात्र तत्काळ करा. ते आवश्यक आहे. वेळ काढून दोघेही आपसात बोला. तुमची लैंगिक संबंधाबद्दलची प्रत्येक भीती, चिंता तुमच्या जोडीदाराला सांगा. तिचे विचार, असतील तर प्रश्न समजून घ्या. बोला. पहा, कदाचित अनेक चिंता ह्या अनाठायी होत्या असे लक्षात येईल. लैंगिक नातेसंबंध, मग ते लग्नाअगोदर असोत किंवा नंतर, परस्पर विश्वास, संमती, आदर या मुल्यांवर आधारित असतील तर अधिक सुखकारक आणि आनंदी होतात. पहिल्यांदाच अशा गंभीर नातेसंबंधात प्रवेश करताना अनेक किंतु-परंतु (anxieties) सगळ्यांच्याच मनात असताता. मुलींसाठी ती अधिक चिंतेची बाब असू शकते. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर बोला. लैंगिक संबंध म्हंजे नेमकं काय, त्यांचे महत्व माणसांच्या जीवनात का आणि कसे असते या मुद्द्यांवर माहिती मिळावा. आपल्या वेबसाईट वर या विषयांना धरून खूप सखोल चर्चा चालू असते. ते लेख वाचा, एकत्र. इतरांची पण सुज्ञ आणि समंजस अशा जवळच्या माणसांची मदत घ्या.

हे करूनही जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल, अस्वस्थ वाटत असेल, तणाव (स्ट्रेस) जाणवत असेल तर आपल्या माहितीतील व्यावसायिक समुपदेशकाची मदत घ्या. चिंता करू नका. ऑल दि बेस्ट..

खाली काही लिंक्स देत आहे. त्यावरील लेख वाचा. तुम्हाला मदत होईल.

https://letstalksexuality.com/what-is-sex/

https://letstalksexuality.com/category/talking-about-sex/

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 7 =