अगदी स्वाभाविक आहे:
तुम्हाला लैंगिक इच्छा होणं अगदी स्वाभाविक आहे. (पण, एखाद्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवत असताना दोघांचीही इच्छा, संमती आणि सुरक्षितता महत्वाची आहे.)
अधिक माहितीसाठी खालील लिंक्सवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/category/talking-about-sex/
सुरक्षितता महत्वाची:
वेश्याव्यवसाय करणा-या व्यक्तींसोबत तसेच कुठल्याही जोडीदारासोबत लैंगिक संबंध करताना निरोधचा वापर करणे फार महत्वाचे आहे. कारण जोडीदारापैकी कोणाला जर एच आय व्ही असेल तर आणि तरच दुसऱ्या जोडीदाराला त्याची लागण होते. कंडोम हे सुरक्षित आणि सोपा उपाय आहे. त्याचा वापर करा.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://letstalksexuality.com/hiv_aids/
अजुन एक खूप महत्वाचे :
लैंगिक संबंध ठेवताना दोघेही सज्ञान (18 वर्ष पूर्ण) असणे महत्वाचेच आहे (अन तुमचे वय 17 च आहे). कारण अशा व्यक्तींवर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, जरी दोघांची संमती असली तरीही. तेव्हा वय 18 होईपर्यंत तुम्हाला थांबावे लागेल.
सुरक्षित पर्याय :
ज्या लोकांना प्रत्यक्ष लैंगिक संबंध ठेवणं शक्य नसतं ते हस्तमैथुन करतात आणि त्यात काहीही गैर नाही.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा