saha mahinyapurvi sex kela hota..condoms vaprle nvte..ani carrierkade bgych aahe mnun sex band kela..last sex saha mahinyapurvi zala..hota..mc yete mahinyala nehmi..aak don diwas pudhe mage hote..padre jate angavrun..bhiti watat rahte pregnency hoel ka..mla carrier kade laksha dych aahe..pan bhitimule conc..karu shakat nahi..plz help
तू तुझ्या करिअर विषयी जागृत आहेस, हे ऐकून छान वाटले. पण इतकं टेन्शन घेण्याची गरज नाही. मासिक पाळी, प्रेग्नंसी/गरोदरपणा, गर्भनिरोधके आणि इतर काही लैंगिकतेविषयी शास्त्रीय माहिती मिळाली की तुझ्या मनातील गैरसमज दूर होतील आणि आपोआपच भीती पण दूर होईल. तुझ्या मनातील शंका दूर करण्यासाठी काही माहिती देत आहे.
१. सहा महिन्यापूर्वी संबंध आले असतील आणि नंतर नियमित पाळी येत असेल तर सध्या गर्भधारणा असण्याची शक्यताच नाही.
२. तू सहा महिन्यांपासून लैंगिक संबधच ठेवले नाहीत तर गर्भधारणा होईल असे तुला का वाटते? गर्भधारणा नक्की कशी होते हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाच. https://letstalksexuality.com/conception/
३. आणखी एक महत्वाची गोष्ट. लैंगिक संबंध हे काही फक्त गर्भधारणा व्हावी म्हणून ठेवायचे नसतात. एकमेकांच्या आनंदासाठी देखील ठेवायचे असतात. गर्भधारणा नको आहे म्हणून लैंगिक संबध पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. https://letstalksexuality.com/prem_kar_swatahvar/ योग्य ते गर्भनिरोधक वापरून लैंगिक संबंध ठेवण्यास हरकत नाही. ‘नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी’ या वेबसाईटवरील लेखातून तुम्हाला अधिक माहिती मिळेल. खाली लिंक दिली आहे. https://letstalksexuality.com/contraception/
४. आता अंगावरून पांढरा जाणाऱ्या स्रावाविषयी बोलूयात. पांढरे पाणी जात असेल याचा अर्थ तुम्ही गरोदर असाल असा होत नाही. कोणत्या परिस्थितीमध्ये योनीतून पांढरे पाणी जाते हे समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच योनीतून होणाऱ्या पांढऱ्या स्रावाविषयी थोडक्यात माहिती लिहित आहे याचा तुला निश्चितच फायदा होईल. स्त्रीच्या योनीतून स्राव होणे याला अंगावरून पांढरे पाणी जाणे असेही म्हंटले जाते. अंगावरून जाणारा पांढरा स्राव याविषयी माहिती असेल तर हा स्राव नैसर्गिक आहे की, आजारामुळे त्यात काही बदल झाला आहे हे समजून घेता येईल. सगळ्याच स्त्रियांना योनीमार्गात ओलासर पणा जाणवतो. योनीतून झिरपणाऱ्या पाण्याला योनिस्राव किंवा पांढरे पाणी असे म्हणतात. या पाण्यामुळे योनी स्वच्छ राहते. स्वाभाविक ओल किंवा पांढरे पाणी आतील कपडे खराब करत नाही. आतील कपडे खराब होतील इतक्या प्रमाणात जर पांढरे पाणी जात असेल तर मात्र चिंता करण्यासारखी गोष्ट असते. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये नैसर्गिकरीत्या योनीतून थोडे जास्त पांढरे पाणी जाते. बीज बिजकोषातून बाहेर पडल्यावर (२४ ते २८ तास पाळीच्या मध्यावर), गरोदरपणी आणि लैंगिक संबंधाच्या वेळेस योनीतून पांढरे पाणी जास्त प्रमाणात जाऊन कपडे खराब होऊ शकतात. हे नैसर्गिक आहे यात चिंता करण्याचे काहीही कारण नाही. मानसिक त्रास, रक्तपांढरी (रक्त कमी झाल्यामुळे) , झोप येत नसल्यास, असंतुलित आहार यामुळे सुद्धा अंगावरून नेहमीपेक्षा थोडे जास्त पांढरे पाणी जाऊ शकते. काही वेळा अति प्रमाणात अंगावरून पांढरे जाते. यामुळे आतील आणि काही वेळा बाहेरचे सुद्धा कपडे ओले होतात. जंतूलागण झाल्याने असे आजार होऊ शकतात. अंगावरून नैसर्गिकरीत्या जाणाऱ्या पांढऱ्या पाण्याचा रंग आणि वास बदलल्यास आजाराचे लक्षण समजून त्यावर उपचार घेतले पाहिजेत. स्वतःच्या नैसर्गिक स्त्रावाचा वास आपल्या परिचयाचा असतो. नेहमीपेक्षा वेगळा दुर्गंधीयुक्त वास असल्यास आजाराचे लक्षण समजून त्यावर उपचार केले पाहिजेत.