गर्भधारणा झाल्यानंतर बाळ होईपर्यंत स्त्रीच्या शरीरात किती तरी बदल होत असतात. पहिला मोठा बदल म्हणजे पाळी येणं थांबतं. कारण जे रक्त पाळीवाटे बाहेर पडत होतं त्या रक्तावर आता गर्भाचं पोषण होत असतं. मग खरं तर बाळ जन्मल्यावर परत पाळी सुरू व्हायला पाहिजे. पण असं लगेच होत नाही. का ते समजून घेऊ या.
आपलं शरीर म्हणजे एक अतिशय जटिल यंत्रणा आहे. शरीरामध्ये एक अत्यंत महत्त्वाची यंत्रणा काम करत असते. तिचं नाव आहे – बायो फीडबॅक. म्हणजे काय तर शरीराला कोणत्या घटकाची, संप्रेरकाची गरज आहे ते मेंदूपर्यंत पोचवण्याची चोख व्यवस्था आपल्या शरीरात असते. मासिक पाळी आणि जननाच्या चक्रामध्ये ही बायो फीडबॅक यंत्रणा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.
बाळ जन्मल्यानंतर पाळीचं चक्र हळू हळू पूर्वपदावर यायला लागतं. पण पाळी लगेच सुरू होत नाही. काही स्त्रियांमध्ये बाळ झाल्यावर तीन ते सहा महिन्यांनी पाळी येते तर काही जणींना दोन वर्षं पाळीच येत नाही. याचा संबंध बाळ अंगावर दूध पितं त्याच्याशी आहे. बाळ जर पूर्णपणे अंगावर दूध पीत असेल तर शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारचं संप्रेरक तयार होतं ज्यामुळे पाळी चक्रासाठी आणि अंडोत्सर्जन होण्यासाठी आवश्यक इतर संप्रेरकं तयार होत नाहीत. बाळ जर दर दोन तासांनी अंगावर दूध पीत असेल तर मेंदूला निरोप मिळतो की अजून बाळ अंगावर पितंय त्यामुळे इतक्यात पुढच्या गर्भाची तयारी नको! जसजसं बाळ अंगावर कमी प्यायला लागेल तसं जनन चक्र हळू हळू पूर्वपदावर येतं आणि अंडोत्सर्जन होऊन पाळी येते. पाळी येते त्या आधी 12-16 दिवस अंडोत्सर्जन झालेलं असतं.
पुढचं बाळ लगेच नको असेल तर बाळंतपणानंतर पहिली पाळी येईपर्यंत पुरुष जोडीदाराने निरोधचा वापर करायला हवा कारण अंडोत्सर्जन झालेलं कळलंच नाही आणि नेमके त्याच काळात संबंध आले तर अशी पाळी येण्याच्या आधीच परत दिवस जाऊ शकतात. याला मराठीत ‘मिंधं राहिलं’ असं म्हणतात. ते टाळण्यासाठी पाळी येईपर्यंत निरोध वापरावा किंवा संभोग न करता इतर प्रकारे एकमेकांना शरीरसुख देता येईल.
19 Responses
Khup Mahtavachi mahiti sangitali…..Yaa Website che founder kon ahet ??
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही आभारी आहोत. ही वेबसाईट तथापि ट्रस्टने सुरु केली आहे. अधिक माहितीसाठी http://www.tathapi.org ही वेबसाईट पाहा.
Prasuti nantar 2 mahinya madhe 3vela maasik pali aley tar hey bare Ka nahii? Plz reply
आम्हाला आपला वैद्यकिय इतिहास माहित नसल्या कारणाने नक्की उत्तर देण्यास आम्ही असमर्थ आहोत. 2 महिन्यात 3 वेळा पाळी येण्यामागे काही संसर्ग आहे कि नाही याबाबत पाहुनच कळेल. त्यामुळे आपण एखाद्या स्त्री रोगतज्ञांंना भेटा व त्यांचा सल्ला घ्या
prasuti nantar 1 varshani pali aali aani parat savva mahini pali aali pan raktstrav kahich 1 hi divas zala nahi. pls upay suggest kara
उपाय हाच आहे की, तुम्ही डॉक्टरांना दाखवा कारण तपासणी केल्याशिवाय नक्की काय कारण आहे हे कळणार नाही.
तेव्हा तपासणी करा, डॉक्टरांना भेटा!
खूपच महत्वपूर्ण माहिती मिळाली.. खूप खूप आभार
धन्यवाद
Mla delivery nantr 2 month ne pali ali pn raktsrav kami zala hota pn tyanantar ajun pali alich nahi…2 month hotil ajun pali alich nahiye
As hou shakt ka ??
Plz reply
पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची अनेक कारणं आहेत. बाळंतपणानंतर असं होण्याची शक्यता आहे मात्र तरीही पाळी न येण्याचे कारण शोधणं गरजेचं आहे. तात्काळ स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घ्या.
तुम्ही वरील लेख वाचला असल्याने तुम्हाला थोडी कल्पना आली असावी की बाळंतपणानंतर काय काळजी घ्यायला हवी ते. जसे की, निरोधचा वापर करु शकता वा इतर मार्गही निवडू शकता.
नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी अधिक माहिती पुढिल लिंकवर पहा. https://letstalksexuality.com/contraception/
बाळंपणानंतर 1 महिना पूर्ण झाल्या नंतर पाळी आली
काहीच कळत नाही.
लगेच पाळी आली त्या मुळे काही प्रॉब्लम नाही येणार ना.
मला किंव्हा माझ्या बाळाला.
नाही, पाळी आली तरी तुम्हाला व बाळाला काही त्रास नाही होणार.
अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा. https://letstalksexuality.com/lactation-and-menstruation/
पाळीची तारीख लक्षात नाही पण मी प्रेग्नेंट आहे
माझ्या पत्नीला प्रसूती होऊन 8 महिने झाले तरी पण पाळी आली नाही आणि पाढरे पाणी जात आहे व खाली पोटात वेदना होतात. काय करावे?
प्रसूतिनंतर बाळ अंगावर पित असल्याने पाळी यायला वेळ लागणे साहाजिक आहे, पांढरे पाणी जाणे हे ही नॉर्मल असू शकते पण जर त्या पाण्याचा नेहमीपेक्षा वेगळा वास येत असेल, त्यामुळे खाज येत असेल व ओटीपोटात वेदना होत असतील तर स्त्रीरोगतज्ञांना भेटाल. नक्की काय होते आहे हे शोधणं महत्वाचे आहे, त्यानूसार त्यावर उपचार करता येतील.
Mala delivery nantar 1 month zhala ki lagech ankhi bleeding Ali 10 diwas tasch rahila tya nantar 2 month nhi Ali ata 4 month madhe Ali is it normal
गर्भधारणेनंतर पाळीचे चक्र पुर्वव्रत होण्यास काही कालावधी लागू शकतो. काही वेळा ३-६ महिने पाळी येत नाही, तर काही वेळा पुढच्या महिन्यापासून पाळी येऊ शकते.हे माणसा माणसानुसार बदलते. परंतु रक्स्त्राव नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात होत असेल किंवा जर पाळी नेहमीपेक्षा जास्त दिवस लांबत असेल तर स्त्रीरोगतज्ञाची मदत घ्यावी.
अजून जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर भेट द्याल. https://letstalksexuality.com/lactation-and-menstruation/
Mala delivery nantr 3 mahinyani pali aali mi bala la changlya prakare feed karte tari pan hyat kahi nuksan nahi na
प्रसूतीनंतर काही महिने मासिक पाळी उशीरा येणे किंवा लवकर येणे हे अगदी नैसर्गिक आहे. पाळी आल्याने दुध कमी-जास्त होण्यावरही परिणाम होत नाही. त्यामुळे स्तनपान करण्यात कोणताही धोका नाही. व काळजी करण्याचे काही कारण नाही.