आपल्या वेबसाईटवर सध्या लिंगाच्या ताठरतेबाबत अनेकदा प्रश्न विचारले जात आहेत. कारण पुरुषांच्या लिंग ताठरतेविषयी अनेक समज-गैरसमज अनेकांच्या मनात असतात.
पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं, हे समजून घेऊयात. मनामध्ये लैंगिक भावना/इच्छा जागृत झाल्यावर वा लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टोस्टेरॉन (Testosterone ) या विशिष्ट संप्रेरकाचे प्रमाण ही कमी होत जाते. ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक व स्वाभाविक आहे.
शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणतणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिच्छा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. लिंग शिथिलतेचा प्रश्न हा अनेक पुरुषांना भेडसावत असतो. जर यामुळे लैंगिक सुख अनुभवण्यास त्रास होत असेल तर त्याला आपण समस्या म्हणू शकतो यामुळे दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते.
सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही असा त्रास होऊ शकतो. यासाठी सेक्सची सवय झाली की हळू हळू यावर ताबा येतो. रिलॅक्सेशन पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. नियमित व्यायाम करणे जसे की, सायकल चालवणे, पळणे, पोहणे, एरोबिक्स, इ. आणि निरोगी आहार घेणे यासारख्या निरोगी जीवनशैलीचा नक्कीच उपयोग होतो.
सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.
लिंगाच्या ताठरतेबाबत समस्या असल्यास ताण, चिंता, लैंगिक संबंधामध्ये अडचणी वा लैंगिक आयुष्याबाबत असमाधानी व स्वत: बद्दलचा आदर कमी होणे अशा समस्या सोबत जाणवायला लागतात. अशावेळी वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.
संदर्भ : https://www.healthline.com/health/erection-problems#complications
7 Responses
लैंगिक शिक्षण ही सद्यस्थितीची खूप नितांत गरज आहे.
आज अनेक गून्ह्यामध्ये लैंगिक समस्या,शारिरीक घडामोडीबाबत गैरसमज,महिला अत्याचार,रूढी परंपरा व प्रजनन याविषयी गैरसमज हीच प्रमूख कारणे आहेत.
महिला पूरूषांना एकमेकांच्या शरीर,अवयव,शारिरीक प्रक्रिया व शरीरविज्ञानाची माहिती असलीच पाहिजे,
हे यामधून शिकवले पाहिजे,
ही तथापि ट्रस्टचे पेज व लेटसटॉकसेक्सॉलिटी हे खूपच क्रांतिकारी पाऊल आहे,
धन्यवाद,,,
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या प्रतिक्रिया कळवत जा. आम्हाला आवडेल.
लिंगाची माघचि नस तूटली तर गर्भ धारना होते का
खूप चांगलं काम करत आहात .. ज्या देशात लोकसंख्या भरमसाठ वाढवायला यांची संस्कृती यांना परवानगी देते पण ज्या क्रियेने ही लोकसंख्या जन्म घेते त्या बद्दल बोलायचं म्हणल की यांची संस्कृती आडवी येते ….पण मुलं तरूण झाली वयात आली तेव्हा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार.. आणि त्यांना ज्या कोणाकडून याची उत्तरे मिळतात त्यांना तरी त्या बद्दल खर्या गोष्टी माहित असतात का? … यामुळे खरचं तुम्ही चालू केलेले हे कार्य खूप चांगलं आहे..
खूप धन्यवाद.
हे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.
मला सेक्स प्रॉब्लेम आहे मम लिंग ठरता येत नाही आणि पाणी लवर बाहेर येते आणि बायको ला 30 मिनिटे तरी चालले पाहिजे तेव्हा तिचे समाधान होते नाही तर नाही
चांगले dr असेल तर सांगा लिंग ठरतात अली पाहिजे आणि कमीत कमी 30 min सेक्स करेल मी dr गेलो होते पण 2 सेंकंद मध्य पाणी बाहेर येते आणि लिंग ठरता येत नाही जास्त मुंबईत dr सांगा प्लझ आणि काय उपाय असेल तर सांगा
तुमचं वय व ही समस्या कधी कधी जाणवते याबाबत तुम्ही काही सांगितलं नाही.
शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणतणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिच्छा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. लिंग शिथिलतेचा प्रश्न हा अनेक पुरुषांना भेडसावत असतो. घाबरु नका वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. या विषयावर अधिक सविस्तर माहिती तुम्ही वरील लेखात वाचली आहेच.
तसेच शीघ्रपतनाच्या बाबत बोलायचे झाले तर प्रत्येकाचा वीर्यपतनाचा काळ वेगवेगळा असू शकतो. ठरवुन असंच व्हायला पाहिजे असं नाही होत. त्यासाठी सोबतच शीघ्रपतनाबाबत काही लिंक देत आहोत त्याही वाचून घ्याल.
https://letstalksexuality.com/premature-ejaculation/
https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/
डॉक्टरांबाबत आम्ही आत्ता काही सांगत नाही तुर्तास लिंगाच्या ताठरता वा शीघ्रपतनाच्या समस्यामुळे ताण, चिंता, लैंगिक संबंधामध्ये अडचणी आहेत व कुणाशी बोलावंसं वाटत असल्यास पुढिल नंबर वर बोलु शकता. नेस्टस् फॉर युथ 7775004350 इथे तुमचं नक्की ऐकुन घेतील. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे. 18 ते 40 या वयोगटातील कुठलीही व्यक्ती या उपक्रमात भाग घेऊ शकते.