प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी एक २२ वर्षीय तरूण मुलगा आहे मी महीन्यातून अनेकदा पॉर्न फ्लिम्स पाहतो ….

मी एक २२ वर्षीय तरूण मुलगा आहे मी महीन्यातून अनेकदा पॉर्न फ्लिम्स पाहतो, संभोग कथा वाचतो , काही वेळा स्वतःही लिखाण करतो पॉर्न चित्र आर्टस् बनवितो आणि पहता पहता हस्तमैथुन करतो , अस करत मला ७-८ वर्षे झालेली आहेत मी पॉर्नस्टार्स मुलींचा चाहता ही आहे , पन लग्नाआधी संभोग नको अस संभोगाच पावित्र मी समजतो ते वैज्ञानिक दृष्ट्या सुरक्षित व परिवारीक जिवनासाठी विवाहबंधना नंतर संभोग योग्य अस मी समजतो (सरसकट मी सगळ्यानवर हे लादत नाही ) माझे संभोगाविषयी आपल्या या वेबसाईटने माझे बरेच प्रश्न सोडविले आहे या साठी मी आपला आभारी आहे आणि आपल्या पुढील वाटचालीस मी आपनास मनपुर्वक शुभेच्छा ही देतो आणि आपन आपल्या परीने आणि वाचकांच्या भावना समजत या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यावे आशी आशा बाळगून मी आपनास पुढील प्रमाने प्रश्न विचारतो कदाचीत ते माझ्या वैयक्तिक भावनेशी ही जोडलेले असू शकतात पन काही माझ्या सारख्या समविचारी तरूनाची पन मानसीक कोंडी सोडवू शकतात तर आपन वितृत्व पद्धतीने व प्रमाणाने माझ्या शंकेचे निरसन करावे प्रश्न पुढिल प्रमाने

मी ज्या वरील पॉर्नसाहित्यात पाहत हस्तमैथुन करतो वैगेरे क्रीया करतो त्याच्यात मला आनंद जरी मिळत असला तरी माझी हस्तमैथुन क्रिया संपल्यावर मला थकवा आणि उदासीनता व अपराधी भावना मना मधे येते , अस का या वरील उपाय जरूर कळवावा ज्याने माझी हस्तमैथुन क्रिये नंतर मला उदासीनता व अपराधी भाव येऊ नये

कधी कधी अस वाटत की आपन संभोगाच्या कल्पनेत असक्त झालोय का?

संभोगाची व उत्तेजनाच्या कल्पनेची नेमकी सिमा कोती व कोनती याच मापंदड नेमक कीती आसाव ?

धर्मशास्त्रात पन संभोग चे बरेच कौतूक केलेले आहे तसेच त्याची वाईट बाजूही दाखविलेली आहे त्यातील एक वाईट बाजू म्हणजे बलात्कार येवढच मला माहीत आहे पन त्या पुढील कल्पना आणि संभोगच्या कल्पनेत रमन हे पन असु शकत का ?

मी स्त्रीयाचा खुप आदर करतो या दृष्टीने मी त्याच्या विषयी त्याना भोग वस्तू समजत नाही पन उत्तेजनाच्या वेळेस तीची गरज भासने हा भोग विचार असु शकतो का ?

आपन सागीतलेल्या स्टॉमीना वाढवायची स्टार्ट अप स्टॉप ही प्रक्रिया मी करून बघीतली पन माझ्या संभोग कल्पना शक्तीमुळे मला १ मिनीटाच्या आतच रस्खलीत व्हावे लागते इच्छा नसतानाही यावर काही वैद्यकिय उपचार आहेत का मला प्रत्यक्ष संभोगाचा अनुभव नाही यामुळे तर हे शिघ्रपतन हस्तमैथुन करताना होत नसेन ना या वर वैद्यकिय उपचार काय कृपया सुचवा ?

अशा करतो की आपन नेहमी प्रमाणेच माझ्या प्रश्नाची योग्य ती उत्तरे देऊन माझे शंका निरसन कराल आपला एक वाचक

1 उत्तर

नमस्कार,
तुमचा प्रश्न मोठा आहे, त्याला सविस्तर उत्तर द्यायला हवे म्हणुन तो मागे राहिला. त्याबद्दल दिलगिरी.
तुम्ही आपल्या वेबसाईटसाठी दिलेली प्रतिक्रिया वाचुन आम्हाला जोमाने काम करण्याची आणखी प्रेरणा मिळाली. धन्यवाद
तुम्ही तुमच्या सोबतच इतरांची काळजी करताना आम्हाला प्रश्नातुन दिसत आहात. त्याच अनुषंगाने उत्तर देत आहोत. आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नांकडे वळूयात. तुम्ही तरुण आहात, 18 वर्षाच्या वरील वयोगटात आहात. तेव्हा तुमच्या खाजगी स्पेस मध्ये पॉर्न फ्लिम्स पाहणं काहीच गैर नाही. अन तुम्ही पॉर्नस्टारचे फॅन आहात तर त्यातही गैर काही नाही.
तसेच हस्तमैथुन करणं तर अजिबातच चुकीचं नाही, त्यामुळे किती वेळा वा किती वर्ष हा विषयच व्हॅलिड नाहीय, हस्तमैथुनानंतर थकवा येणं साहजिक आहे, पण उदासीनता किंवा अपराधीपणाची भावना ही हस्तमैथुनाबाबत चुकीच्या धारणा मनात धरल्यामुळे येते. आपल्या वेबसाईटवर आपण हस्तमैथुनाबाबत चुकीच्या धारणांबाबत चर्चा करत असतोच. त्यामुळे हस्तमैथुनाबाबत खूप माहिती वेबसाईटवर आहेच त्यासाठी पुढील लिंक्स पाहा व ऐकासुदधा.
https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
https://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/
https://letstalksexuality.com/episode-8-sex-ani-barach-kahi/
लग्नाआधी संभोग करावा की नाही हा प्रत्येकाचा व्यक्तिगत मुद्दा आहे. आपण त्याचा आदर करायलाच हवा. आम्ही तुमच्याही विचाराचा आदर करतो आहोत. आमचं असं म्हणणं आहे की, प्रेम, जबाबदारी, संमती, काळजी, सुरक्षितता, इ बाबी आल्या की झालं त्यासाठी पवित्र वैगेरे मुद्दे एवढे महत्वाचे ठरत नाहीत. हो आता आपल्या सामाजिक व सांस्कृतिक परिवेशात या गोष्टिंकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोण तुम्हाला माहित आहेच. अन त्याचा नाही म्हटलं तरी आपल्या मनावर परिणाम होतोच. त्यासाठी आपल्याला आपल्या मनावर काम लागेल. करुयात ना? सोबत लिंक देत आहोत नक्की पहाल.
https://letstalksexuality.com/sex-before-marriage/
https://letstalksexuality.com/choosing-partner-and-sexuality-by-dr-shantanu/
https://letstalksexuality.com/just_friends/
संभोगाची किंवा उत्तेजनाच्या कल्पनेची कोणतीच सीमा नसते मित्रा. तुला जे छान, भारी वाटेल त्याची कल्पना करु शकतोस. अन कल्पनेला कसली आलियेत बंधने? स्वत:च्या आनंदासाठी इतरांना काही त्रास न देता कल्पना करणं फार उत्तम. तसेच कुठल्याही गोष्टींची आसक्ती असणं चुकिचं कसं असू शकेल. पण त्या आसक्ती मुळे जर स्वत: ला वा इतरांना त्रास होत असेल तर मात्र विचार करायला लागेल. अन त्यासाठी समुपदेशक आहेतच मदत करायला. आम्हीही करु की मदत गरज असेल तर.
भारतीय संस्कृतीच्या परिपेक्षात संभोग अन त्याबाबत विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहेच, जसे की आपल्याकडील मंदिरांवरची शिल्पे, कामसुत्रासारखा ग्रंथ, अन खूप काही. आपल्या वेबसाईटवर लैंगिकता व संस्कृती या सदरात याबाबत बराच उहापोह केलेला आहे. सोबत लिंक देत आहोत.
https://letstalksexuality.com/category/what-is-sexuality/
तुम्ही स्त्रियांचा आदर करता, त्यांना भोगवस्तु समजत नाही हे एक चांगल्या माणसाचे लक्षण आहे. जेव्हा लैंगिक उत्तेजना येते तेव्हा स्त्रीचा विचार मनात येणं साहजिक आहे. तुम्ही जो भोग विचार म्हणत आहात तो नक्की काय आहे? त्यामागे जर कुणाला दुखवायचा, त्रास न देण्याचा विचार असेल व जे काही कराल ते त्या व्यक्तीच्या संमतीने करत असाल तर हा विचार चुकीचा कसा असेल?
आपल्याला स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट या शिघ्रपतनाच्या समस्येवर असणा-या तार्किक उपायाचा वापर करावा का वाटला? हस्तमैथुन करतेवेळी अन 1 मिनिट ही फार मोठी वेळ आहे. यासाठी वैद्यकिय उपचारांची तुम्हाला काही गरज नाही आहे. अन जर तुम्हाला प्रत्यक्ष संभोगाचा अनुभव नाही याला तुम्ही शिघ्रपतन तरी का म्हणत आहात? वर तुम्हाला ज्या हस्तमैथुनाबाबत माहिती देणा-या लिंक दिलेल्या आहेत त्या नीट वाचल्या व ऐकल्या तर हा प्रश्न पडणारच नाही.
अन प्रत्यक्ष संभोगादरम्यान ब-याच बाबी असतात करण्यासाठी जसे की, फोर प्लेचा वापर करु शकता, एकमेकांच्या संमतीने वेगवगळ्या लैंगिक क्रियांचा अवलंब करु शकता, आणखी खूप काही. अधिक माहितीसाठी सोबत काही लिंक देत आहोत.
https://letstalksexuality.com/orgasm/
https://letstalksexuality.com/foreplay/
https://letstalksexuality.com/sexual-pleasure/
https://letstalksexuality.com/sexual-pleasure-2/
थोडक्यात काय तर तुम्ही खूप सा-या संभ्रमात आहात. काही करायच्या आधीच प्रचंड तणावाखाली आहात. स्वत;ला वेळ द्या, तुमच्या लैंगिक आवडी निवडी शोधा, तुमचं लैंगिक आयुष्य नक्कीच निकोप, सुखकर होईल. अजुन तुमच्याकडे खूप वेळ आहे, त्याचा सदुपयोग करा. तुमची लिखाणाची शैली उत्तम आहे, तुम्ही तुमचे व तुमच्या मित्रमैत्रिणींचे लैंगिकतेबाबतचे चांगले वाईट अनुभव लिहित चला. तुमचं लिखाण आम्हाला letstalksexuality.com@gmail.com या ई मेल वर पाठवा. आम्ही त्यातील निवडक लिखाण आपल्या वेबसाईटवर नक्की प्रकाशित करु.
तुम्हाला खूप शुभेच्छा !!!

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 11 =