हस्तमैथुन asked 5 years ago

माझं वय 23 वर्ष आहे. मी आठवड्यातून 1 ते 2 वेळा हस्तमैथुन करतो. पण माझा असा प्राँब्लेम आहे की हस्तमैथुन करताना 3-4 मिनिटांतच वीर्य पतन होते, हे नॉर्मल आहे का? मला याचा वेळ कसा वाढवता येईल आणि लिंगाची ताठरता पण जास्त वेळ टिकवण्यासाठी उपाय सांगा. मी अजून एकदाही सेक्स केलेला नाही. माझे पुढील वर्षी लग्न होणार आहे कृपया मार्गदर्शन करावे.

1 उत्तर

हस्तमैथुनामध्ये विर्यपतनासाठी 3-4 मिनिटं हा खूप उत्तम कालावधी आहे. तुम्हाला अजुन वेळ का हवा आहे? हा काही प्राँब्लेम नाही आहे असं आम्हाला वाटतं आहे. तुम्ही अजुन कुणासोबत लैंगिक संबंध केलेले नाहीत, तेव्हा पुढची काळजी आत्ताच का करत आहात. प्रत्येक अनुभव वेगळा असतो. लग्नानंतर वेगळा अन छान अनुभव घ्याल. आपल्या वेबसाईट वरील काही लिंक देतो ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

https://letstalksexuality.com/orgasm/

https://letstalksexuality.com/foreplay/

https://letstalksexuality.com/sexual-relations-and-her-pleasure/

https://letstalksexuality.com/sexual-pleasure-2/

https://letstalksexuality.com/sexual-pleasure/

https://letstalksexuality.com/premature-ejaculation/

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

पूर्ण वेबसाईट वाचा, अजुन काही गोष्टी नव्याने कळतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 6 =