Ling samasya........ asked 7 years ago

Mi vayachya 16 years pasun hastmaithun karat aahe….. Ata maze vay 29 years aahe……. Pan aata mala sharirik kamjori janvat aahe….. Lingacha akar lahan disat aahe…… Aani sex kartana ling purnpane uttejit hot nahi ….aani zal tari lagech 1 minute madhe punha baril hot…yamule mi purn sex karu shakat nahi tasach jodidarala pan samadhan deu shakat nahi…….. Tasech maza lingavarchi katdi mage jaat nahi…..aani mi keli tar lingachi cap sparsh kelyane pan dukhate……..

Pudhchya varshi lagn honar aahe……. Pls…. Asha paristitit mi kaay karav …… Pls apan upaay sang…. Mi yapurvi barech dr. Kade jaun aalo aahe tyamule pls…..tumhi suggest kara konte medicine gheu kinva ekhade yogya and perfect dr….je he ajar bare kartil……… Please …. Thank u……

1 उत्तर
Answer for Ling samasya........ answered 7 years ago

मित्रा, घाबरून जाण्याचे कारण नाही. तुमच्या प्रश्नामध्ये अनेक मुद्दे आहेत. एका एका विषयी विस्ताराने बोलूयात.

१. पहिलं म्हणजे, हस्तमैथुन केल्याने हा सगळं त्रास होत आहे असं तुला वाटत असेल तर ते डोक्यातून काढून टाक. हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही.

आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

२. तुझा दुसरा प्रश्न आहे, लिंग उत्तेजित होत नाही. पहिलं आपण हे समजून घेऊया की पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टेरॉन या विशिष्ट सम्प्रेरकाचे प्रमाण ही कमी होत जाते ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणताणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिछा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. लिंग शिथिलतेचा प्रश्न हा अनेक पुरुषांना भेडसावत असतो. जर यामुळे लैंगिक सुख अनुभवण्यास त्रास होत असेल तर त्याला आपण समस्या म्हणू शकतो यामुळे दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही असा त्रास होऊ शकतो होऊ शकतो. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. यासाठी सेक्सची सवय झाली की हळू हळू यावर ताबा येतो. रिलॅक्सेशन पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

३. तिसरा प्रश्न आहे, उत्तेजना मिळाली तरीही लगेच शीघ्रपतन होते. १. शीघ्रपतन होण्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात, त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा. https://letstalksexuality.com/premature-ejaculation आणि https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

४. चौथा प्रश्न आहे, लिंगावरची कातडी मागे जात नाही. त्याविषयी बोलूयात. अनेकवेळा लैंगिक संबंधांच्या सुरुवातीच्या काळामध्ये लिंगावरची त्वचा मागे जाताना थोडाफार त्रास होऊ शकतो. परंतु हळूहळू हा त्रास कमी होत जातो आणि लिंगावरची त्वचा मागे जायला सुरुवात होते. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. हस्तमैथुन करताना किंवा संभोग करताना लिंगावरची त्वचा मागे न जाता त्रास होत असेल तर सुंता करणं आवश्यक असतं. सुंता करणे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/male-circumcision/

५. शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे, लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या. तुम्ही तुमच्या भागातील डॉक्टरांना/सेक्सॉलॉजिस्टला भेटा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 15 =