रिव्हेंज पोर्न – वेळीच सावध होऊ या

प्रेम प्रकरणात काही बिनसलं म्हणून किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी आपल्या प्रेयसीचे किंवा प्रियकराचे काही अगदी खाजगी असणारे फोटो फेसबुकवर अपलोड केल्याच्या आणि त्यातून त्या कधी काळी जवळच्या असणाऱ्या व्यक्तीवर बदला घेण्याचे प्रकार सगळीकडेच वाढत आहेत. या प्रकाराला Revenge Porn असं म्हटले जातं. नग्न अवस्थेतले किंवा अगदी खाजगी असे लैंगिक क्रिया करतानाचे फोटो जाहीरपणे प्रसिद्ध करणं, त्या व्यक्तीच्या चारित्र्याविषयी, लैंगिक आवडी निवडींविषयी काही मानहानी करणारा मजकूर लिहिणं अशा या प्रकारामुळे अनेक मुलं-मुली, स्त्रिया पुरुष बदनाम होतात. त्यातल्या मानहानीमुळे आत्महत्या करण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

ब्रिटनमध्ये रिव्हेंज पोर्नचा वापर करून आपल्याच मैत्रिणीचे काही फोटो फेसबुकवर टाकल्याप्रकरणी एका स्त्रीला शिक्षा झाली आहे. आपल्या मैत्रिणीचे अगदी खाजगी स्वरुपाचे फोटो टाकून तिची मानहानी होईल अशा प्रकारचा मजकूर त्यासोबत लिहिल्याबद्दल 31 वर्षाच्या या स्त्रीला 18 महिन्याची कैद सुनावण्यात आली.

प्रेम, नाती मोडली तरी कधी काळी आपल्या इतक्या जवळ असणाऱ्या व्यक्तीची बेअब्रू करण्याची भावना, तिचा किंवा त्याचा खाजगीपणाचा अधिकार डावलून बदनामी करण्याची ही भावना आपल्याला तुरुंगातही नेऊ शकते. नातं तुटलं तरी बदल्याची आग आपल्यालाच जाळून टाकू शकते. जे जिथं संपलं ते तिथेच सोडायला शिकणं फार गरजेचं झालं आहे.

वेळीच सावध होऊ या…

image courtesy – pinterest.com

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap