तुम्हाला असे काहीही करायची गरज नाही जे तुम्हाला पटत नाहिये. तुम्हाला न पटणारी एखादी गोष्ट करण्यासाठी तुमच्यावर दबाव आणला जात असल्यास, याला जबरदस्ती म्हणतात, जरी ती गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची असली तरीही. लैंगिक संमती म्हणजे दोन लोक एका विशिष्ट लैंगिक वर्तनात सहभागी होण्यास सक्रियपणे इच्छुक आहेत आणि “हो! ते माझ्यासाठी ठीक आहे” असे बोलून त्यांची संमती व्यक्त करतात. परंतु एखाद्याने एका प्रकारच्या वर्तनात गुंतण्यास संमती दिली म्हणून, याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी दुसर्या प्रकारच्या वर्तानासाठी देखील सहमती दिली आहे. कोणत्याही टप्प्यावर काय करायचे आहे किंवा काय करायचे नाही याबद्दल तुमचे मत बदलण्याचा तुम्हाला अधिकार आहे!
#consent, #teenager,
No Responses