वेबसाईटवर काही वाचकांनी मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध ठेवावेत की नाही असा प्रश्न विचारला होता, म्हणून त्यावर आधारित लेख देत आहे.
मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स करू नये असा काहीही नियम नाही. हा एक प्रचलित गैरसमज आहे की मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीर संबंध येऊ देऊ नयेत. या गैर समाजाचा संबंध पाळीच्या काळात स्त्री अपवित्र असते, तिला स्पर्श वर्ज असतो, पाळीतील रक्त अपवित्र असतं म्हणून तिला ‘बाजूला’ बसवलं गेलं पाहिजे इ. अशास्त्रीय बाबी ज्या आपण अनेक पिढ्या सांभाळत आलो आहोत त्यांच्याशी आहे. या पितृप्रधान परंपरा आणि गैरसमजुतीनाच प्रश्न विचारणं गरजेचं आहे.
पण या सोबतच एक गोष्ट लक्षात ठेवू या की, काही स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होतो. या त्रासामुळे तिला विश्रांतीची गरज वाटू शकते. पाळी दरम्यान रक्तस्त्राव होत असतो. त्रासामुळे तिचा मूड नसेल तर संभोग करू नये. काहींना मासिक पाळीच्या वेळी योनीतून रक्त जात असताना त्यात लिंग घालून संभोग करायला घाण वाटतं, असं वाटत असेल तर या काळात संभोग करू नये. या काळात ओटी पोटात दुखणे, पाठ दुखणे किंवा चीड चीड होणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. अशा काळात शरीर संबंधांची इच्छा नसणं, नको वाटणं सहज आहे. तसं असेल तर त्याचा आदर कारण गरजेचं आहे.
पाळीच्यावेळी स्त्रीच्या योनीच्या आतल्या भागाला संरक्षण करणाऱ्या जिवाणूंचे संतुलन बिघडलेलं असतं. अशा वेळी जर निरोध न वापरता संभोग झाला व जर पुरुषाला एड्स किंवा इतर लैंगिक आजार असेल तर स्त्रीला लैंगिक आजारांची लागण होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
शरीर संबंधांसाठी त्यात सामील व्यक्तींनी एकमेकांची संमती, इच्छा, एकमेकांप्रती किमान आदर आणि सर्वांचा आनंद या गोष्टींना महत्व देणं फार गरजेचं आहे.
12 Responses
Mere wife ko pried month hoke panch din ho gaye hai to game panchve din sex karana chahiye kya or aisa karne se pried ayenge kya
यह पुरी तरह से आपके पार्टनर के माहवारी चक्र के उपर निर्भर है I अधिक जानकारी के लिये lovematters.in को भेट दे I
Sir pried ke 30 days aur 10 din ho chuke hai abhi sex karnese ruka huva grabh gir jayega kya
अगर दोनों चाहते है, दोनों की सहमती है और कुछ विशिष्ट समस्या ना हो तो गर्भावस्था के दौरान सेक्स करने में कोई दिक्कत नाही है । जादा तर गर्भधारणा हुई है यह दुसरे महिने में समझ में आता है I तब तक शरीरसंबंध होने की संभावना होती ही है I शरीर संबंध का भ्रूण पर कोई असर नहीं होता।
लेकीन कुछ विशिष्ट परिस्थिती में शरीरसंबध ना करे ! इसके पहले एक या एक से अधिक गर्भपात का इतिहास/हिस्ट्री है तो डॉक्टर पहले कुछ महीनों में शरीरसंबंध ना बनाने की अक्सर सलाह देते है। ऐसी स्थिती में योनिमैथुन ना करें । गर्भावस्था के दौरान गर्भाशय के मुंह खुल जाना, या खून बहना यह गंभीर है। ऐसी स्थिती में भी शरीरसंबंध ना बनाने की अक्सर सलाह देते है I अगर स्त्री पहली बार प्रेग्नंट है तो आखरी दो महिनों में संबध ना बनाये I इस अवधि में गर्भ को इन्फेशन ना हो इसलिये यौन संबंध के दौरान कंडोम का इस्तेमाल किया जाना चाहिए।

माझ्या प्रेयसी चे period 2 month Zale आले नाहियेत, जेव्हा आम्ही संबंध ठेवले त्यानंतर एकदा Period आले होते नंतर आता 2 month झाले तरी period येत नाहियेत उपाय सांगना, kit ne 3 वेळा चेक केले pregnant pn निगेटिव्ह dakhwat आहे, plz उपाय सांगा…
जर संबंध आल्यानंंतर पाळी आली होती अन नंतर पाळी येत नाही म्हणजे काहीतरी वेगळं कारण असू शकते. कृपया स्त्रीरोग तज्ञांंची मदत घ्या.
पुढच्या वेळेस इथे प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंंक वर जाऊन प्रश्न विचारा.
Masik pali yaycha 1 divs aagodr nirodh n vaprta sex kele tr tablets ghave lagel ka…. Aani aaj pali pn chalu zali aahe tr… Tablets cha upyog krne chagle rahil ka
पाळी आली असल्यास गोळी घ्यायची काही गरज वाटत नाही आहे, गर्भधारणेची शक्यता फारच कमी आहे. पुढील वेळी मात्र काळजी घेणे गरजेचे आहे. नको असणारी गर्भधारणा रोखण्यासाठी निरोधचा वापर करावा.
अधिक माहितीसाठी पुढील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/conception/
https://letstalksexuality.com/contraception/
https://letstalksexuality.com/sex_during_periods/
मला आता 4 महीना चालु आहे माझी सेक्स करण्याची इच्छा होत असते व सेक्स करण्याची योग्य पोजिशन कोणती कोणत्या पोजिशन मध्ये सेक्स करावा तर गर्भ धारणेच्या कितव्या महीन्या सेक्स करने योग्य आहे व माझे पती मुखमैथुन करायला लावतात काय गर्भ धारणेत मुखमैथुन किंवा योनी मैथुन करणे योग्य आहे का आणी लिग मैथुन करताना वीर्य गिळले गेल्यास काही अपाय होऊ शकतो का त्याना काहीच आजार नाही आणि माझा स्तनांमधुन चिगट पदार्थ बाहेर येतो काही खुप प्रमाण येत असतो असे का होते
दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल आणि काही विशिष्ट समस्या नसेल तर गरोदरपणात शरीर संबंधावर खरं तर काही निर्बंध असण्याची आवश्यकता नाही. गर्भ असताना महिला जोडीदाराची सोय किंवा comfort बघून काय पोजिशन घ्यावी हे ठरवलेले चांगले. जर तुमची गर्भ राहण्याची पहिली वेळ असेल तर शेवटचा महिन्यात संभोग करणे टाळावे. तरीही डॉक्टरांचा सल्ला घेतलेले उत्तम. जर जोडीदाराला लिंग सांसर्गिक आजार नसेल तर गर्भ असताना मुखमैथुन किंवा योनिमैथुन करण्यात काहीही अपाय नाही. तसेच वीर्य गिळले गेले तरी धोकादायक नसते. गर्भधारणेच्या काळात चौथ्या महिन्यात स्तनांमधून “colostrum” नावाचा स्त्राव होऊ शकतो. ह्यात अनैसर्गिक असे काही नाही, जर स्त्राव होत असताना वेदना होत असतील तर मात्र वैद्यकीय सल्ला घ्यावा. यावर अजून जाणून घेण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
https://letstalksexuality.com/sex-during-pregnancy/