प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला porn बघण्याची सवय आहे

आपल्या या वेबसाइटचा माझ्यासारख्या तरुणांना खुप फायदा झाला व होत आहे… याबद्दल आपले मनापासून धन्यवाद..विचारायच आहे की मला porn बघण्याची सवय आहे ज्या वेळेस मी एकटा असेन त्या वेळी मी खाजगीत पाहतो.कोणाला याचा त्रास होईल यामुळे मी नेहमी एकांतात पाहते. आपल्या येथे porn पाहणे, Download करणे किंवा Search करणे यावर बंदी आहे काय? गेल्या दोन महिन्यांपासून मी Newspaper ला वाचत आहे. त्यामुळे मला आता खूप भीती वाटत आहे. याबद्दल मी कोणाशी बोलू शकत नाही. माझे मित्र ही मला यामुळे घाबरवत आहे. कृपया याचे लवकरच Answer द्यावे. माझ वय 25 वर्ष आहे.

1 उत्तर
Answer for Porn answered 4 years ago

तुम्हाला आपल्या वेबसाईटचा फायदा होतो आहे हे वाचून छान वाटलं.

तुमच्या सारखेच खूप लोक पोर्न पाहत असतात, अन तुम्ही जर एकांतात पाहता त्यामुळे कुठल्याच कायद्याचा भंग होत नाही.

आपण कायदा काय म्हणतो पाहूयात :

– अश्लील वाङ्मय तयार करणं, विकणं भा.दं.सं. २९२ कलमानुसार गुन्हा आहे.

– २० वर्षांखालील मुला/मुलींना अश्लील वाङ्मय विकणं भा.दं.सं. २९३ नुसार गुन्हा आहे.

– एखात्या व्यक्तीने अश्लील वाङ्मय खाजगीत बघणं, बाळगणे गुन्हा नाही. पण ते दुस-यांना दाखवणं, देणं, विकणं, पाठवणं गुन्हा आहे.

सध्या आपल्याकडे वर्तमानपत्रात जी चर्चा चालू आहे ती वरील दुस-या मुद्द्याबद्दल चालू आहेत, child pornography बाबत. या विषयी अधिक माहितीसाठी पुढील लिंक वाचा https://letstalksexuality.com/over-25000-cases-of-child-pornography-in-last-5-months-in-india/

पोर्न बाबत काही इतर लेख देत आहोत ते ही नक्की वाचा.

https://letstalksexuality.com/poll-on-porn-website-ban/

https://letstalksexuality.com/pornography-feminist-critique/

https://letstalksexuality.com/revenge-porn-lands-woman-in-jail/

https://letstalksexuality.com/fiction-reality/

https://letstalksexuality.com/dont_shoot/

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 19 =