प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsHow to do sex? I want to know how to do sex with wife?

Hello maz age 28 aahe aani mi ekdahi sex kelele nahiaata maz lagna tharat aahe tr mala sex karanya aadhi kay kalaji ghyavi lagel?

1 उत्तर

तू विचारलेला प्रश्न महत्वाचा आणि आवश्यक आहे. तू तुझ्या लैंगिक आरोग्याबद्दल सजग आहे हे वाचून छान वाटलं. याबद्दल तुझं अभिनंदन आणि तुझ्या वैवाहिक आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा.

आता तुझ्या प्रश्नाबद्दल बोलू या. साधारण वयात आल्यापासून मुलांना लैंगिक जाणिवा यायला लागतात. अशा किशोरी वयामध्ये मुलं-मुली हस्तमैथुन करुन लैंगिक सुख मिळवतात. भारतामध्ये प्रौढ होण्याचं वय १८ वर्षे आहे. यानंतर तुम्ही संमतीने केलेल्या संभोगाला(sex) ला कायदेशीर मान्यता आहे. दोन्ही जोडीदारांनी लैंगिकतेच्या मूल्याबद्दल एकमेकांशी बोललं पाहिजे. लैंगिकता म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकाच्या लैंगिक भावना वेगवेगळ्या पध्दतीनं व्यक्त होत असतात. याबद्दल अधिक माहितीसाठी खाली काही लिंक दिल्या आहेत.

  1. लैंगिकता म्हणजे नक्की काय काय?

    https://letstalksexuality.com/what-exactly-is-sexuality/

  2. लैंगिकतेची काही मूलभूत तत्वं

    https://letstalksexuality.com/core-values-of-sexuality/

  3. विविध प्रकारची लैंगिकता आणि लैंगिक कल

    https://letstalksexuality.com/sexual-orientation-and-diversity/

सर्वात महत्वाची बाब म्हणजे केव्हाही संभोग करताना दोघांची संमंती असणं फार आवश्यक आहे. अन्यथा एकमेकांबद्दल अनादर निर्माण होवू शकतो जो लैंगिक आरोग्यामध्ये महत्वपूर्ण आहे. प्रत्यक्ष संभोग करण्यापूर्वी कामक्रिडा(फोरप्ले) महत्वाची असते. यामध्ये स्त्री-पुरुष एकमेकांच्या शरीराशी चाळा करुन लैंगिक उत्तेजना निर्माण करतात. संभोगामध्ये पुरुष जोडीदार स्त्री जोडीदाराच्या योनीमध्ये त्याचं लिंग घालून एकमेकांना लैंगिक सुखाचा आनंद देत असतात. परंतू केवळ योनी मार्गातूनच लैंगिक सुख एकमेकांना देता येतं असं अजिबात. मुखमैथुन किंवा गुदामैथुनाच्या पध्दतीदेखील लैंगिक सुख मिळवण्यासाठी वापरल्या जातात. याबद्दल आणि नेहमी विचारल्या जाण्यार्या प्रश्नांबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

लैंगिक आरोग्य उत्तम असणं महत्वाचं आहे. याबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

  1. योनीमार्गाचे काही आजार

    https://letstalksexuality.com/reproductive-tract-infections/

  2. HIV/AIDS

    https://letstalksexuality.com/hiv_aids/

सर्वांत शेवटी तुम्ही ज्यावेळी संभोग करता त्यावेळी गर्भधारणेची शक्यता नेहमीच असते. त्यामुळं नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य त्या गर्भनिरोधकांचा वापर करणं आवश्यक आहे. गर्भधारणा नक्की कशी होते? नको असणारी गर्भधारणा कशी टाळायची? याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

  1. गर्भधारणा नक्की कशी होते?

    https://letstalksexuality.com/conception/

  2. नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी

    https://letstalksexuality.com/contraception/

  3. धोकादायक गर्भनिरोधके

    https://letstalksexuality.com/hazardous-contraceptives/

याशिवाय तुला अजून काही प्रश्न असतील तर या वेबसाईटवर नक्की विचार किंवा प्रत्यक्ष डॉक्टरांची मदत घेतली तरी चालेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 18 =