सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १० : पाळी बिळी गुप चिळी

2,565

कटकट, प्रॉब्लेम, विटाळ, अडचण अशा अनेक उपमांनी बदनाम झालेली मासिक पाळी नक्की का येते, तिच्यासंबंधी इतके गैरसमज याबद्दल तुम्हालाही काही शंका आहेत का? डॉ. उज्ज्वल नेने या एपिसोडमध्ये गौरी आणि निहारशी बोलतायत पाळीबद्दल. जरूर ऐका. तुमच्या मनातल्या शंका तर आम्हाला विचाराच आणि सेक्स आणि बरंच काही या पॉडकास्टबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही लिहून कळवा.

4 Comments
 1. शिवाजी says

  माझा प्रश्न थोडा विचित्र आहे;
  विद्यार्थ्यांची लैंगिकता आकर्षण मूळे अभ्यासातील असलेली रुची कमी होते व अशा विद्यार्थ्यांना परत अभ्यासाकडे कसे वळवावे या संदर्भात आपण मार्गदर्शन करावे किंवा ग्रुप वर चर्चा घडवून आणावी किंवा कोणी असा लैंगिक समुपदेशन करणारा ग्रुप असेल तर कळवा

  1. let's talk sexuality says

   सेक्स विषयीची भावना मनात येणं हे स्वाभाविक आहे. मनातल्या इतर भावनांप्रमाणेच सेक्सची किंवा लैंगिक भावना मनात निर्माण होते. वयात येताना, तरुणपणी किंवा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर लैंगिक भावना मनात येऊ शकतात. त्या शमवण्यासाठी कुणी हस्तमैथुन करतं, कुणी जोडीदार असेल तर सेक्स करतं तर कुणी काही इतर प्रकारे सेक्सची भावना शमवतात. सतत सेक्सबद्दल बोलणं, फिल्म पाहणं, वाचणं या कृतीतूनही अशा इच्छा सतत मनात येऊ शकतात. लैंगिक भावना अनावर होत असतील तर काही साधे उपाय करून पाहता येतील. जसं की,
   अ) लैंगिक भावनांना उत्तेजित करणा-या कथा, कादंब-या, नाटकं (पोर्नोग्राफी) वाचण्याचं टाळलं पाहिजे. तसंच लैंगिक भावनांना खतपाणी घालून चेतवणारी चित्रं, चित्रपट, टी.व्ही. पाहणं प्रयत्नपूर्वक टाळलं पाहिजे.
   आ) व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने, आपला व्यतिरिक्तचा वेळ स्वत:च्या आवडत्या कार्यात किंवा अभ्यासात गुंतवला पाहिजे. उदा. छंद, स्पर्धा, खेळ, सामूहिक काम, इ.
   इ) आपला मित्रपरिवार निवडताना विचार केला पाहिजे. काही समवयस्क तरुण मंडळी ‘सेक्स’, व्यसनं, हिंसाचार यांत आनंद घेणारी असतात. त्यांच्या दबावाला आपण अगदी नकळत बळी पडू शकतो. अशा मित्रांच्या गटापासून दूर राहिलं पाहिजे.
   ई) तरुण – तरुणींच्या संमिश्र गटामध्ये निकोप, खेळकर वातवरण असतं. सर्वांगीण विकास व्हायला असे गट उपयोगी ठरतात. एवढंच नव्हे तर निकोप व जबाबदार अशा सहजीवनाचा आनंद मिळतो व लैंगिक ताण कमी प्रमाणात जाणवतात, असा सर्वांचा अनुभवही आहे.
   एक लक्षात घ्या. सेक्स किंवा लैंगिक भावना वाईट नाहीत. अनावर लैंगिक भावना मात्र वेळीच ओळखली पाहिजे, तिला आवर घातला पाहिजे अन त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.

   जर या विषयावर अशाच काही मुलांसोबत चर्चा करायची असल्यास https://chat.whatsapp.com/1XflUKMmUy4JAJBocWbZ0W या व्हाटसऍप च्या गटात आपण चर्चा करु शकतो.

   जर कुणाशी बोलावंसंं वाटत असल्यास प्रयास मार्फत एक गट चालवला जातो. तुम्ही भेट देऊ शकता. लिंक सोबत देत आहे तेथे माहिती मिळेल. http://www.facebook.com/105190397540984/photos/a.132071678186189/132074064852617/?type=3&scmts=scwspsdd

 2. राहुल says

  सर…. मी एक hiv बाधित महिले सोबत असुरक्षित सेक्स केला आहे…. तिला त्यावेळी मासिक पाळी आली होती….. तिचा viral load tnd आहे.

  1. let's talk sexuality says

   काय झालं ते कळालं पण तुम्ही प्रश्न विचारला नाही, असो
   निरोधशिवाय लैंगिक संबंध ठेवणे जास्त धोकादायक आहे हे आधी लक्षात घ्या. त्यामुळे hiv/aids, लिंगसांसर्गिक आजार होण्याची जास्त शकयता असते.
   मासिक पाळीमध्ये तर निरोध नाही वापरला तर संसर्गाची शक्यता कैक पटिने वाढते.
   त्यामुळे जर तुम्हाला संसर्ग झाला की नाही हे समजुन घ्यायचे असल्यास hiv/aids ची चाचणी करावी लागेल. त्याशिवाय निदान होत नाही.
   अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा व त्याखालील कमेंट ही वाचाल
   https://letstalksexuality.com/hiv_aids/

Comments are closed.