एच आय व्ही – एड्स

एच आय व्ही म्हणजेच ह्यूमन इम्युनो डेफिशिअन्सी व्हायरस (HIV – Human Immune-Deficiency Virus). शरीराची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू. एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिण्ड्रोम (AIDS – Acquired Immune-Deficiency Syndrome). ही आजाराची एक अवस्था आहे. या संसर्गामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती नष्ट व्हायला लागते. याचा परिणाम म्हणजेच शरीर कोणत्याही प्रकारच्या जंतुलागणीचा मुकाबला करू शकत नाही. औषधे न घेतल्यास एचआयव्हीचं रुपांतर काही काळाने एड्समध्ये होतं. एचआयव्ही बरा होऊ शकत नाही. मात्र आता औषधं आणि योग्य आहाराच्या मदतीने एचआयव्ही असला तरी चांगलं आयुष्य जगता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो.
एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (योनिमैथुन आणि गुदमैथुन) लागण होऊ शकते.

एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे

  • एचआयव्ही असलेले रक्त लागलेल्या निर्जंतुक  न केलेल्या इंजेकशनच्या सुया,
  • एचआयव्ही असलेले रक्त  दुसऱ्या व्यक्तीस दिले  गेल्यास आणि
  • गर्भवतीला एचआयव्ही असेल तर तिच्या पोटातल्या बाळाला गर्भारपणात, बाळंतपणात किंवा आईच्या दुधातून एचआयव्हीची लागण होऊ शकते.

लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.

लक्षणं

एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणं

एचआयव्हीची आधीची लक्षणं साध्या सर्दी-तापासारखी असतात. ताप, अंगदुखी, खोकला, इत्यादी. असुरक्षित संभोगानंतर 3 ते 6 आठवड्याच्या आत पुढील लक्षणं जाणवू लागली तर एचआयव्ही तपासणी करणं गरजेचं आहे.

  • ताप, डोकेदुखी
  • जुलाब
  • अंगावर रॅश, पुरळ

एचआयव्हीची लागण नसेल तर ही लक्षणं कसल्याही उपचराशिवाय जाऊ शकतात. मात्र लागण झाली असेल तर ही लक्षणं कित्येक महिने तशीच राहतात. आणि हळूहळू शरीराची प्रतिकार शक्ती नष्ट करतात.

एड्सची लक्षणं

  • वजनात प्रचंड घट
  • भूक न लागणे
  • सतत जुलाब
  • त्वचेचा कॅन्सर
  • मेंदूज्वर
  • क्षयरोग
निदान कसं करायचं?

एचआयव्हीची लागण झाल्याची शक्यता वाटत असेल (निरोध न वापरता केलेला संभोग, निर्जंतुक न केलेल्या सुया वापरल्या असतील किंवा अंगात रक्त भरलं असेल) तर रक्ततपासणी करता येते. मात्र त्यासाठी ३ महिने वाट पाहून मग तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. एचआयव्हीची लागण झाली असेल तर त्या विषाणूच्या विरोधात शरीरात प्रतिद्रव्ये तयार होतात. संसर्ग झाल्यावर अशी प्रतिद्रव्ये तयार होण्यासाठी किमान तीन महिन्याचा काळ जावा लागतो. रक्ताच्या तपासणीमध्ये अशी प्रतिद्रव्ये तयार झाली आहेत का ते पाहिले जाते. ३ महिन्याच्या आधी रक्त तपासणी केली तर काहीवेळा ही प्रतिद्रव्ये दिसून येत नाहीत आणि एचआयव्ही झाला असेल तरी त्याची लागण नाही असा रिपोर्ट येतो. यामुळे पुन्हा रक्ताची तपासणी होणं गरजेचं आहे.

उपचार

एचआयव्हीवर कोणताही इलाज नाही. मात्र जीवनशैलीत आवश्यक बदल केले तर एचआयव्हीची लागण झाल्यानंतरही व्यक्ती संपूर्ण आयुष्य व्यवस्थित राहू शकते. सध्याच्या औषधांमुळे एड्सची अवस्था टाळता येऊ शकते. या औषधांना अण्टीरेट्रोव्हायरल औषधे म्हणतात. ही औषधं विषाणूची वाढ थोपवतात.

एचआयव्ही होऊ नये म्हणून – 

लैंगिक संबंधातून लागण टाळण्यासाठी: 

  • निरोधचा वापर
  • एकाहून अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध टाळा. किंवा असे संबंध नेहमी निरोधचा वापर करूनच ठेवा.
  • पुरुषांमध्ये सुंता केल्याने म्हणजेच लिंगाच्या पुढची त्वचा काढून टाकल्याने लिंगसांसर्गिक आजारांची लागण होण्याचा धोका ५०  टक्क्यांनी कमी होतो.
  • जननेंद्रियांवर फोड, व्रण, अनियमित स्राव किंवा वेदना असेल तर तपासणी करून घ्या. इतर कोणते लिंगसांसर्गिक आजार असतील तर एचआयव्हीची लागण होण्याचा धोका वाढतो.

रक्तातून लागण होऊ नये म्हणून : 

  • शरीरात रक्त भरताना ते अधिकृत रक्तपेढीतूनच घ्या. रक्ताची एचआयव्ही तपासणी झाली आहे का नाही हे तपासून बघा. रक्ताच्या पिशवीवर त्या रक्तावर केलेल्या सर्व तपासण्यांची नोंद असते.
  • निर्जंतुक न केलेल्या सुयांचा वापर कटाक्षाने टाळा. प्रत्येक वेळी नवीन सुई वापरा.
  • एकमेकांच्या इंजेक्शन्स किंवा सुया वापरू नका. शिरेतून नशा घेणाऱ्या व्यक्तींसाठी हे खास करून महत्त्वाचं आहे.

आईकडून बाळाला लागण होऊ नये म्हणून : 

  • आईला एचआयव्ही असेल तर गरोदरपणी एआरटी औषधे सुरु करावीत. आधीपासून औषधे सुरु असली तर ती न थांबवता सुरुच ठेवावीत. योग्य औषधोपचार  मिळाले तर बाळाला एचआयव्हीची लागण होण्याची जवळजवळ शक्यता नसते.
हे समजून घ्या

आपल्याला कोणत्याही कारणाने एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे अशी शंका मनात असल्यास लगेच निदान करून घ्या. एक लक्षात घ्या वेळेवर निदान झालं आणि उपचार सुरू झाले तर एचआयव्ही झाला म्हणजे आयुष्य संपत नाही. जर काही काळजी घेतली आणि आपल्या जीवनशैलीत बदल केले तर एचआयव्ही असतानाही चांगलं आयुष्य जगण्याच्या शक्यता वाढवता येतात. निरोगी जीवनशैली, वेळेवर आरोग्य तपासणी, पोषक आहार आणि सकारात्मक मानसिकता यामुळे एचआयव्हीसह जीवन चांगलं जगता येऊ शकतं.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

93 Responses

  1. Prakash Marathe says:

    HIV झालेल्या व्यक्तीच्या तोंडामधील लाळेमध्ये HIV चे जन्तु असतात का ?

    • I सोच says:

      एच. आय. व्ही. चे प्रमाण लाळेमध्ये अगदी नगण्य असते. कीस करताना लाळेची मोठ्या प्रमाणात अदलाबदल होण्याची शक्यता नसते. चुंबन घेताना एच. आय. व्ही. चा मुखात प्रवेश झाला तरी विषाणू गिळले जाण्याची अधिक शक्यता असते. जठराच्या माध्यमातून प्रौढ व्यक्तींना एच. आय. व्ही. होत नाही. तोंडातील लहान जखमांमधून एच. आय. व्ही. विषाणू प्रवेश करण्याची शक्यता असे काहीवेळा म्हंटले जाते. मात्र कीस केल्याने लैंगिक उत्तेजना निर्माण होऊन असुरक्षित संभोग झाला तर मात्र एच. आय. व्ही. होण्याचा धोका वाढतो.

  2. deepak says:

    Partner ko aur mere ko hiv nahi hai uske sath bar bar sex karne se hiv ho sakta hai

    • deepak says:

      Mere 2 grail Friend hai une hiv nahi aur muje hiv nahi hai to hiv hone khatra hai kya

      • I सोच says:

        जिस व्यक्ती को एड्स है उसके साथ यौनसंबंध बनाने से एच. आय. व्ही. होने की संभावना बढती है I अगर आप जिसके साथ यौनसंबंध राखते है उसे एड्स नहीं है तो चिंता करने की जरुरत नहीं है I लेकिन गर्भधारणा और अन्य लिंगसांसर्गिक बीमारी की रोकधाम के लिए कंडोम का इस्तमाल करना जरुरी है I

      • Rahul says:

        HIV 4TH GENERATION(metropolis labs) duo test by CMIA day 62 DAY (0.15),DAY 88(0.13) Ani by ECLIA day 118(0.2) ALL NON REACTIVE ASTIL but symptoms like gilayla trass hone ,hyper acid reflux asel tr results conclusive astil ka parat test karavi lagel ka karan windows nanantr test kelya ahet or parat 6 month la retest karaychi garaj ahe Kay ? Karah kahi guidelines different window period dakhavtat

        • let's talk sexuality says:

          एचआयव्ही साठी विंडो पिरीयड हा सहा ते बारा आठवडे असा असतो. तुमची ११८ दिवसांनंतरची टेस्ट नॉन रिआकटीव्ह असेल तर काळजीचे कारण नाही. पुन्हा सहा महिन्यांनंतर टेस्ट करायची गरज नाही. तुम्हाला होत असलेला त्रास आसिडिटी मुळे होऊ शकतो. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

    • I सोच says:

      अगर आप दोनों को एड्स नहीं है तो चिंता करने की जरुरत नहीं है I लेकिन गर्भधारणा और अन्य लिंगसांसर्गिक बीमारी की रोकधाम के लिए कंडोम का इस्तमाल करना जरुरी है I

  3. shobha gawali says:

    Agar beena condon ke sambandh 3 /4 logo ke sath rakhne se ho sakta hai kya.

    • I सोच says:

      अगर आप एच आय व्ही के बारे में जानना चाहते है तो यह महत्वपूर्ण सवाल आपने पूछा हैI एच.आय.व्ही / एड्स लैंगिक संबंधोद्वारा फैलनेवाली बीमारी हैI जिन व्यक्तियों के साथ लैंगिक सम्बंध है उसमेसे किसीको भी एच.आय. व्ही का संसर्ग नहीं हुआ है तो एच.आय.व्ही की बाधा नहीं होगीI लेकिन किसी को देखनेसे ये अंदाजा नहीं लगा सकते की वो व्यक्ति एच.आय.व्ही संक्रमित है की नहींI इस संसर्ग को पहचानने या जानने के लिए मेडिकल जांच यही इकमात्र पर्याय हैI इसलिए एच आय व्ही की बाधा से दूर रहने के लिए या सुरक्षित लैंगिक सम्बंध बनाने के लिए कन्डोम का उपयोग जरुरी होता हैI
      एच.आय.व्ही / एड्स के बारे में अधिक जानकारी के लिए निचे दी हुई लिंक पे क्लिक किजिएI (जानकारी मराठी में है)
      https://letstalksexuality.com/hiv_aids/

  4. Shree says:

    जर एक किंवा जास्त मुलीनं सोबत जर मुख मुखमेतून केला असेल या,
    या स्त्री च्या योनी मार्गाला मैथुन सुख दिला असेल, आणि या पैकी कोणाला ही HIV नसेल तर , काही संभावना आहे का ….???
    या दोघांसोबत करत असताना जर या मध्ये time period खूप कालावधीचा असेल तर ….त्याचा फायदा होऊ शकतो का….???

  5. समीर चाहल says:

    सर, मै और मेरा दोस्त एक लडकी के साथ बार बार सेक्स करते है।मेरा दोस्त हप्ते मे 2 ते 3 बार करता है लेकींन मै हर दिन मै 2 ते 3 बार करता हू। पहले ओ बार बार सेक्स करता था जैसे मे अब करता हू ।मै सेक्स करते समय उसकी योनी अपने मूह से चाटता हू ,किस भी करता हू।कभी कभी मै उसके योनी से अनेवाला स्त्राव भी पी लेता हू वैसे ही वो लडकी भी मेरा लिंग अपने मूह मे लेती है और कहि बार उसने मेरा वीर्य भी पिया है। हम में से किसींको एड्स नही है। तो क्या मुझे और मेरे partener को और हम तिन को एड्स हो सकता है क्या।plz मुझे ans जलदी भेजो

  6. Ajay kadam says:

    एड्स असलेल्या व्यक्ती ला किस केल्याने आपल्याला एड्स होतो का?

  7. दत्ता says:

    सभोगा नंतर 1आठवडयात एचआईवीची लक्षणे जाणवतात का? जसे की जुलाब?

    • I सोच says:

      मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स करू नये असा काहीही नियम नाही. हा एक प्रचलित गैरसमज आहे की मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीर संबंध येऊ देऊ नयेत. या गैर समाजाचा संबंध पाळीच्या काळात स्त्री अपवित्र असते, तिला स्पर्श वर्ज असतो, पाळीतील रक्त अपवित्र असतं म्हणून तिला ‘बाजूला’ बसवलं गेलं पाहिजे इ. अशास्त्रीय बाबी ज्या आपण अनेक पिढ्या सांभाळत आलो आहोत त्यांच्याशी आहे. या पितृप्रधान परंपरा आणि गैरसमजुतीनाच प्रश्न विचारणं गरजेचं आहे.

      पण या सोबतच एक गोष्ट लक्षात ठेवू या की, काही स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होतो. या त्रासामुळे तिला विश्रांतीची गरज वाटू शकते. पाळी दरम्यान रक्तस्त्राव होत असतो. त्रासामुळे तिचा मूड नसेल तर संभोग करू नये. काहींना मासिक पाळीच्या वेळी योनीतून रक्त जात असताना त्यात लिंग घालून संभोग करायला घाण वाटतं, असं वाटत असेल तर या काळात संभोग करू नये. या काळात ओटी पोटात दुखणे, पाठ दुखणे किंवा चीड चीड होणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. अशा काळात शरीर संबंधांची इच्छा नसणं, नको वाटणं सहज आहे. तसं असेल तर त्याचा आदर कारण गरजेचं आहे.

      पाळीच्यावेळी स्त्रीच्या योनीच्या आतल्या भागाला संरक्षण करणाऱ्या जिवाणूंचे संतुलन बिघडलेलं असतं. अशा वेळी जर निरोध न वापरता संभोग झाला व जर पुरुषाला एड्स किंवा इतर लैंगिक आजार असेल तर स्त्रीला लैंगिक आजारांची लागण होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. शरीर संबंधांसाठी त्यात सामील व्यक्तींनी एकमेकांची संमती, इच्छा, एकमेकांप्रती किमान आदर आणि सर्वांचा आनंद या गोष्टींना महत्व देणं फार गरजेचं आहे.

      अधिक माहितीसाठी खालील लिंकवर भेट द्या.
      https://letstalksexuality.com/sex_during_periods/

  8. Sonu says:

    Sir hiv teast 15 महीने me 5 बार करवाया nigitve hay oar चेक करना चाहिए kay plz batavo मायने aek accident के पेशंट को उठाया था so plz ans दीजिए mam

    • I सोच says:

      अगर आपने किसी पेशंट को उठाया तो HIV क्यु होगा? ऐसा नही हो सकता. आपने अगर 5 बार चेक भी किया है तो घबराना कैसा?
      फिर भी आपको घबराहट हो रही है तो 1097 इस हेल्पलाईन पर फोन करके सहायता मांग सकते हो.

      आप के और कोई सवाल हो तो https://letstalksexuality.com/ask-questions/ इस लिंक पर भेजिये

  9. mayur dhumal says:

    1.)सर एच आय व्ही व्यक्ती सोबत निरोधचा वापर करून सेक्स केल्याने एच आय व्ही होऊ शकतो का.?

    2)वेश्या किंवा कॉल गर्ल सोबत संभोग करणे सुरक्षित आहे का?

    • I सोच says:

      1)एच आय व्ही व्यक्ती सोबत निरोधचा वापर करून सेक्स केल्याने एच आय व्ही होण्याचा धोका कमी होतो. कारण संभोग करताना बाकिच्या बर्‍याच गोष्टी होत असतात अन तिथुन संसर्ग होण्याची शक्यता असू शकते. अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/hiv_aids/ या लिंकला भेट द्या.
      2)वेश्या किंवा कॉल गर्ल सोबत संभोग हा निरोधचा वापर करुन केला तर सुरक्षित होऊ शकतो.

  10. Pratik says:

    Hiv किंवा एड्सअसलेल्या महिलेसोबत कंडोम वापरून सभोग केल्यावर एड्स किंवा इन्फेकॅशन होण्याची शक्यता किती असते?
    कंडोम वापरल्याने किती प्रमाणात सुरक्षा मिळते?पहिल्यांदाच सेक्स केल्यावर hiv होण्याची किती शक्यता असते?सेक्स करताना एकावेळी किती कंडोमम वापरावीत?

    • I सोच says:

      Hiv झालेल्या महिलासोबत कंडोम लावून संभोग केल्यावर एड्स किंवा इन्फेकॅशन होण्याचा धोका कमी होतो, पूर्णत: टळतो असे नाही कारण संभोग करताना बाकिच्या ब-याच गोष्टी घडत असतातच की, अन हो संभोग करताना एकच निरोध वापरावा, एकावर एक चढवुन 2 निरोध वापरु नयेत, त्याने निरोध फ़ाटू शकतात. याबाबत अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/hiv_aids/ या लिंकला भेट द्या.
      पुढच्या वेळेस या ठिकाणी प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर प्रश्न विचारा

  11. aniket says:

    bf sobat pn sex zalay n dusra bf pn aahe jr sex krtana tyachi sperm an thod blood aat gelyas hiv hoto ka
    2 sobat bina com sex zalay

    • I सोच says:

      शरीरातील स्रावांमधून एच.आय.व्ही.ची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एच.आय.व्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो.
      एच.आय.व्ही.ची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते.
      अधिक माहीतीसाठी खालील लिंक्वर क्लिक करा.
      https://letstalksexuality.com/hiv_aids/

  12. Pmd says:

    पिक्चरटाँकीज मध्ये टाचनी टोचविल्याने एडस झाला अशी बातमी खरी असु शकते का ?

    • I सोच says:

      असे काही होण्याची शक्यता कमी आहे पण त्यावेळी नक्की काय परिस्थिती काय होती यावर काय होणार हे अवलंबून असते. या बाबतीत आणखी माहितीसाठी पुढील लिंक नक्की पहा
      https://letstalksexuality.com/hiv_aids/

      आणखी काही प्रश्न असल्यास या ठिकाणी न विच्रारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर जाऊन विचारा
      धन्यवाद

  13. Prathamesh says:

    एच आय व्ही बाधीत स्रीचे ब्रेस्ट चोखल्याने लागण होते का ?

    • I सोच says:

      त्यामागे खूप सार्‍या गोष्टी असू शकतात. म्हणजे स्तनांवर, हाताला, ओठाला, दातांमध्ये वा तोंडाला जर छोटी/बारीक जखम असेल. जिथुन संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
      अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/hiv_aids/ इथे भेट द्या
      पुढच्या वेळेस या ठिकाणी प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर प्रश्न विचारा

  14. Kachru says:

    Maz lagn houn 2 varsh zaliy, maza job gadivar firnuacha ahe mazya penis la infection zal, pandhrya pural alya mazyamul tichya yonila pan reaction zalay hiv che lakshan ahe ka?

    • I सोच says:

      घाबरु नका, तुम्ही सांगितलेल्या लक्षणांवरुन एडस आहे की नाही याचे अनुमान नाही काढता येत. एचआयव्हीची लागण झाल्याची शक्यता वाटत असेल (निरोध न वापरता केलेला संभोग, निर्जंतुक न केलेल्या सुया वापरल्या असतील किंवा अंगात रक्त भरलं असेल) तर रक्ततपासणी करता येते. मात्र त्यासाठी ३ महिने वाट पाहून मग तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. एचआयव्हीची लागण झाली असेल तर त्या विषाणूच्या विरोधात शरीरात प्रतिद्रव्ये तयार होतात. संसर्ग झाल्यावर अशी प्रतिद्रव्ये तयार होण्यासाठी किमान २ महिन्याचा काळ जावा लागतो. रक्ताच्या तपासणीमध्ये अशी प्रतिद्रव्ये तयार झाली आहेत का ते पाहिले जाते. ३ महिन्याच्या आधी रक्त तपासणी केली तर ही प्रतिद्रव्ये मिळत नाहीत आणि एचआयव्ही झाला असेल तरी त्याची लागण नाही असा रिपोर्ट येतो. यामुळे पुन्हा रक्ताची तपासणी होणं गरजेचं आहे.
      म्हणून तुम्ही लवकरात लवकर तुमच्या पत्नीसोबत जाऊन डॉक्टरांना भेटा व पुढिल उपचाराची प्रक्रिया सुरु करा.

  15. Anant says:

    असुरक्षित संभोगानंतर कमीत कमी किती दिवसात HIV ची लक्षणे दिसतात?

    • I सोच says:

      असुरक्षित संभोगानंतर 3 ते 6 आठवड्याच्या आत ताप, डोकेदुखी, जुलाब, अंगावर रॅश, पुरळ लक्षणं जाणवू लागली तर एच.आय.व्ही तपासणी करणं गरजेचं आहे. अन प्रत्येकवेळी अशी लक्षणं दिसतीलच असेही नाही. तेव्हा अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
      https://letstalksexuality.com/hiv_aids/

      • Rajan says:

        7 saal bad ho sakta hai kya hiv

        • जैसे कि हम जानते है की HIV एक विषाणू है और इस विषाणू के संक्रमण के कारण धीरे-धीरे मनुष्य की रोग प्रतिरोधी क्षमता खत्म होती है और कुछ सालो के बाद HIV संक्रमण की दूसरी अवस्था AIDS आती हैं. आप 7 साल पुरानी बात बता रहे है, तो जब तक सही टेस्ट ना किये जाएं, तब तक निश्चित तौर पर नहीं कहा जा सकता कि वायरस संक्रमण है या नहीं.
          National AIDS Control Organisation (NACO) ने एक helpline चालू कि है उसका toll-free number 1097 है, आप यहा फोन करके अधिक जानकारी ले सकते है.

      • Anant says:

        मी 1097 ला कॉल केला होता. त्यांनी सांगितले की hiv ची सुरवातीची कोणतीही लक्षणे नसतात… माझा संभोग झाल्यानंतर 4 दिवसानंतर 10 दिवस सर्दी, 4 दिवस ताप आणि एक आठवडा खोकला होता… डॉक्टर कडून गोळ्या घेतल्यानंतर बरा झाला… तर hiv ची शंका घेता येईल का?

        • तुम्हाला एचआयव्हीची लागण झाल्याची शक्यता वाटत असेल तर रक्ततपासणी करुनच त्याची खात्री होऊ शकते. दुसरा कुठलाही खात्रीशीर मार्ग नाही आहे. मात्र त्यासाठी ३ महिने वाट पाहून मग तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. एचआयव्हीची लागण झाली असेल तर त्या विषाणूच्या विरोधात शरीरात प्रतिद्रव्ये तयार होतात. संसर्ग झाल्यावर अशी प्रतिद्रव्ये तयार होण्यासाठी किमान २ महिन्याचा काळ जावा लागतो. रक्ताच्या तपासणीमध्ये अशी प्रतिद्रव्ये तयार झाली आहेत का ते पाहिले जाते. ३ महिन्याच्या आधी रक्त तपासणी केली तर ही प्रतिद्रव्ये मिळत नाहीत आणि एचआयव्ही झाला असेल तरी त्याची लागण नाही असा रिपोर्ट येतो.
          तेव्हा तुम्ही तुमच्या रक्ताची HIV ची चाचणी करुन घ्या व चिंतामुक्त व्हा.

  16. Sanket says:

    Agar age 15 saall ho tab anal sex kiya hai
    7saal ho gaaye aur partner HIV +be tha to HIV hota hai kya ,but mera penis uske anal me nhi gaya that surf bahar lagaya tha to HIV ho sakta hai kya

    • आपने जैसे कहा उससे पता चल रहा है की, आपका दोस्त पहले से संक्रमित था और आप दोनों ने 15 साल पहले असुरक्षित सेक्स किया था तो आप खतरे के दायरे में है. जैसा कि हम सब जानते हैं जब तक सही टेस्ट ना किये जाएं, निश्चित तौर पर नहीं कहा जा सकता कि वायरस संक्रमण है या नहीं. और ये 15 साल पहले कि बात है तो दोस्त आपको जादा घबराने की जरुरत नही है, सिर्फ सही टेस्ट करवा लो तो आप की घबराहट कम हो जायेगी. अच्छे रहो खूश रहो.

      इस विषय पर आपके जादा जानकारी के लिए निचे दी गयी लिंक देखे.
      https://letstalksexuality.com/hiv_aids/

  17. pd says:

    maza GF Cha parents na aids hota but ticha janmacha 10 varshananter te warle mg Tila HIV asu shkto ka…
    mi tichabrobr without condom sex kela ahe but mala tas khi symptoms janvle nhit…

    • मित्रा, तुझी काळजी लक्षात येते आहे. तुम्ही सांगितल्यानूसार खूप सार्या शक्यता यात आहेत. जर तुमच्या मैत्रिणीच्या जन्माच्या वेळेस त्यांचे आई वडिल HIV/AIDS सह जगत होते का? की, तुमच्या मैत्रिणी च्या जन्माच्या नंतर त्यांना HIV चा संसर्ग झाला. अन अजुन खूप सार्या शक्यता आहेत.
      त्यामुळे सध्या तुमच्या व तुमच्या मैत्रिणीच्या पुढच्या आयुष्यासाठी हे महत्वाचे की, सध्याची काय परिस्थिती आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या मैत्रिणीची HIV ची टेस्ट करणे गरजेचे आहे. त्याने सर्व निदान होईल व मनातली शंकेचे निरसन होईल. टॆस्ट कधी व केव्हा करायची यासाठी हा लेख परत वाचा. अन अजिबात ताण घेऊ नका, पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.

  18. Vidya Khude says:

    एचआयव्ही झालेल्य माणसाचे वीर्य महिलेच्या योनी मध्ये गेले नसे नसेल पण सेक्स केला असेल तर त्या महिलेला एचआयव्ही होऊ शकतो का

  19. Kishor hingde says:

    सर हातावर गोंधले आणि एका महिन्या नंतर थोड बाजूला एका जागी सूज आली आणि आता 15 दिवस झाले आजुन ही ती सूज आहे तर काय समजावे थोड सांगा सर या बद्दल

    • घाबरून जाऊ नका,आधी डॉक्टरांना भेटा व त्यांचा सल्ला घ्या, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील.

  20. AJit gawade says:

    Sir maze boys to boys sex zale 4-5 Janansobat so bat mla hiv houshkto ka..typaiki konalach nasta tri

    • निरोध शिवाय जर शारीरिक संबंध आलेले असतील तर ते कधीही धोकादायकच असतात. अन कुणाला HIV/AIDS आहे हे वरून कळत नाही त्यासाठी चाचणी करावी लागते.
      चाचणी कधी? का? कुठे? करायची यासाठी वरची पोस्ट व त्याखालच्या कमेंट्स परत नक्की वाचा.

      यानंतर कधीही प्रश्न विचारण्यासाठी पुढील लिंकवर जात चला.
      https://letstalksexuality.com/ask-questions/

  21. AJIT Gawade says:

    Pan sir ya gostila 3 yer zale ani…ani ya 3 varshat mi 5 test kelya non reactive Ali. .tr bhavishyat positive hou shakte ka..

    • नाही!
      पण परत या मधल्या काळात किंवा भविष्यात जर कधी असुरक्षित(निरोध शिवाय)शारीरिक संबंंध आले तर परत चाचणी करावी लागेल. त्यामुळे नेहमी निरोधचा वापर करा व अशा लिंगसांसर्गिक आजारांपासून आपले रक्षण करा.

      पुढील वेळी या ठिकाणी प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर जाऊन प्रश्न विचारावेत

  22. kn says:

    सर माझं एका पेक्षा अधिक विवाहित महिलांशी संबंध विना कंडोमचा झालाय , आणि या प्रत्येक संबंधमध्ये 4 ते 5 दिवसांचा ग्याप आहे , तर HIV होण्याचे कारण आहे का ?

    • निरोध शिवाय जर शारीरिक संबंध आलेले असतील तर ते कधीही धोकादायकच असतात. अन कुणाला HIV/AIDS आहे हे वरून कळत नाही त्यासाठी चाचणी करावी लागते.तुमचे संबंध असणाऱ्या कुठल्याही महिलेला जर HIV/AIDS असेल तर तो तुमच्याकडे सहज संसर्गित होऊ शकतो. म्हणून चाचणी करून घ्या.

      एचआयव्हीची लागण झाल्याची शक्यता वाटत असेल रक्ततपासणी करता येते. मात्र त्यासाठी शेवटचे असुरक्षित शारीरिक संबंध (निरोध शिवाय केलेले) आल्यानंतर तिथपासून ३ महिने वाट पाहून मग तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण एचआयव्हीची लागण झाली असेल तर त्या विषाणूच्या विरोधात शरीरात प्रतिद्रव्ये तयार होतात. संसर्ग झाल्यावर अशी प्रतिद्रव्ये तयार होण्यासाठी किमान २ महिन्याचा काळ जावा लागतो. रक्ताच्या तपासणीमध्ये अशी प्रतिद्रव्ये तयार झाली आहेत का ते पाहिले जाते. ३ महिन्याच्या आधी रक्त तपासणी केली तर ही प्रतिद्रव्ये मिळत नाहीत आणि एचआयव्ही झाला असेल तरी त्याची लागण नाही असा रिपोर्ट येतो. यामुळे पुन्हा रक्ताची तपासणी होणं गरजेचं आहे.

      यानंतर प्रश्न विचारण्यासाठी पुढील लिंकवर जावे
      https://letstalksexuality.com/ask-questions/

  23. Rushikesh karale says:

    H.i.v जर एका व्यक्तीला आहे आणी समोरच्या व्यक्तिला नाहि आनि त्याचे संबध आले तर h.i.v होऊ शकतो का?

    • निरोध शिवाय जर शारीरिक संबंध आले तर HIV सह जगणाऱ्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्ती ला HIV चा संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त पटीने वाढते. म्हणून शारीरिक संबंध करताना निरोध चा वापर करणे महत्वाचे आहे.

  24. s says:

    I due to prone type masterbation hiv cause. I’m doing it from 2010 does it leads hiv

    • तुमचा प्रश्न नीट कळत नाही आहे, सविस्तरपणे लिहिला तर उत्तर द्यायला मदत होईल.

  25. abhishek bhaisare says:

    Hiv positive aslelya vyakti ch blood juice mdhe mix krun dilya gel age mla
    Tr mla aids honar ka

    • नाही, कारण HIV चा विषाणू या परिस्थितीत तग नाही धरू शकत. संसर्ग होण्याची कारणे वरती दिलेली आहेतच, आवश्यकता वाटल्यास वरील लेख नव्याने पुन्हा वाचा.

  26. Attu Patil says:

    जर मी एका व्यक्ती सोबत मुखमैथुन केल व नंतर 2-3 दिवसांनी एका वेश्या व्यवसाय करणार्या महिला सोबत संभोग करत असताना जर निरोध अचानक फाटला तर मला HIV/AIDS होऊ शकतो का..??
    ( वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही व्यक्ती ना HIV नाहीये )
    सांगा सर मी खुप घाबरलो आहे

    • जर संभोग करणा-या व्यक्तींमध्ये कुणाला HIV/AIDS नसेल तर त्याचा संसर्ग एकाकडून दुस-याला नाहीच होणार, पण कुणाला HIV आहे वा नाही हे चाचणी न करता कळत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. पण निरोध फाटला वा मुखमैथुन करतानाही जर एखाद्या व्यक्तीला HIV/AIDS असेल तर दुस-याला संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा निरोध वापरताना तो योग्य पद्धतीने घालणे गरजेचे असते.
      अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा https://letstalksexuality.com/use-of-men-condom/, https://letstalksexuality.com/condom-part-2/, https://letstalksexuality.com/dental-dam/ .

      एचआयव्हीची लागण झाल्याची शक्यता वाटत असेल रक्ततपासणी करता येते. मात्र त्यासाठी शेवटचे असुरक्षित शारीरिक संबंध (निरोध शिवाय केलेले) आल्यानंतर तिथपासून ३ महिने वाट पाहून मग तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण एचआयव्हीची लागण झाली असेल तर त्या विषाणूच्या विरोधात शरीरात प्रतिद्रव्ये तयार होतात. संसर्ग झाल्यावर अशी प्रतिद्रव्ये तयार होण्यासाठी किमान २ महिन्याचा काळ जावा लागतो. रक्ताच्या तपासणीमध्ये अशी प्रतिद्रव्ये तयार झाली आहेत का ते पाहिले जाते. ३ महिन्याच्या आधी रक्त तपासणी केली तर ही प्रतिद्रव्ये मिळत नाहीत आणि एचआयव्ही झाला असेल तरी त्याची लागण नाही असा रिपोर्ट येतो. यामुळे पुन्हा रक्ताची तपासणी होणं गरजेचं आहे.

      यानंतर प्रश्न विचारण्यासाठी पुढील लिंकवर जावे
      https://letstalksexuality.com/ask-questions/

      • राकेश says:

        लडके ने लडके के साथ मुखमैथुन किया तो इससे भी कुछ खतरा है क्या?

        • निरोधशिवाय केल्या जाणा-या कुठल्याही शारीरिक संबंधामुळे hiv/ aids ची सैंद्धांतिक पातळीवर शक्यता खूप कमी असते पण लिंगसांसर्गिक आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. तेव्हा मुखमैथुन करायचे असेल तरीही काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पुढील लिंक पहा. https://letstalksexuality.com/dental-dam/

  27. Jbl says:

    Aids aslelya stree la period yete ka

  28. महेश says:

    सर जर 10 महिन्यापूर्वी असुरक्षित संभोग केला असेल आणि त्यानंतर मलेरिया किंवा डेंग्यू आजार झाले आणि ते बरे पण झालेत.वजनामध्ये वाढ झाली आहे ही लक्षणे एड्स ची आहेत का

    • सुरवातीला कुठलीही लक्षणे पाहून आपण एड्स आहे की नाही हे कळत नाही, त्यासाठी एड्सची चाचणी करावीच लागेल.
      अधिक माहितीसाठी वरील लेख पुन्हा वाचा

  29. चेतन पाटील says:

    मि बाहेर वेश्यासोबत सेक्स केल. पण मि जसे सेक्स करायला लागलो तर लगेच 1 मिनिटात कोन्डम फाटले.मग त्या बाईने लगेच दुसरे दोन कंडोम चढवले मग आम्ही सेक्स केल.तर मला भिती होती की यामुळे मला एच आय व्ही होईल का? मला मार्गदर्शन करा . तसा. कोणताही स्राव तिच्या. योनितुन झाला नव्हता.व ति बोलताना बोली. कि पैसे आयुष्य भर कमवता.येतील.पण जिवन एकदाच मिळतो.त्या मुळे तुम्हालाही रोग नाही ..आणी मला पण रोग नाही.मि घाबरुण हा व्यवसाय करते.पण तरीही मला भिती वाटत होती.

    • तुमची परिस्थिती लक्षात येते आहे, ब-याच वेळा निरोध कसा वापरायचा याचे योग्य मार्गदर्शन – माहिती नसल्याने निरोध फाटू शकतो.निरोध कसा वापरायचा याबाबत माहिती सोबतच्या लिंकमध्ये दिली आहे. https://letstalksexuality.com/use-of-men-condom/ , https://letstalksexuality.com/condom-part-2/.

      एकावेळेस एकच निरोध वापरावा, दोन वापरले तर ते एकमेकांना घासुन फ़ाटतात. अशाच काही बाबी आहेत ज्या निरोधबाबत महत्वाच्या आहेत, सोबतची लिंक पहा. https://letstalksexuality.com/myths-and-facts-about-condom/

      त्या महिलेने तुम्हाला संगितले आहे व घडलेल्या तुमच्या परिस्थितीत तशी जास्त शक्यता वाटत नाही. तरीही या सगळ्या शक्यताच आहेत. अन कुणा व्यक्तिला एडस आहे की नाही हे आपण पाहुन सांगु शकत नाही. त्यासाठी चाचणी करावीच लागते. ही चाचणी असुरक्षित शारीरिक संबंध आल्यानंतर 3 महिन्यांनी करायची असते. या मधल्या काळात जर पुन्हा असे असुरक्षित शारीरिक संबंध आले तर पुन्हा तिथुन पुढे 3 महिने थांबुन ही चाचणी करावी लागते. एडस व त्याबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंक वाचा. https://letstalksexuality.com/hiv_aids/, https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

      तुम्हालाही एड्सचा संसर्ग झाला आहे की नाही, हे चाचणी केल्याशिवाय कळणार नाही. तेव्हा जास्त टेंशन घेऊ नका, सध्या या आजारावर ही औषधे आहेत व त्यामुळे hiv/एडस सोबत जगणा-या माणसांचे आयुर्मान वाढवता येते आहे.

  30. Aniket says:

    Sir meri gf ki ma ki HIV se death Hui hai gf ki age abhi 23 hai…. Mera usase only 7 month ki relationship thi…….. Maine blood tests Kiya hai Voh negative usaki tabbet bi thik thak hai aur uske bhai ki thik thak Ghai…Lekin man ghabrata hai

    Pahla sex December Mai hua tha us ke bad har 15 day kbi kbi without condom …… Toh for kya kare Maine kal hi taste ki hai…….. Karibi logose pata chlata hai ki unhe Abhi is 8 sal Mai yah huva hai yah pata chala tha …..use 23 years Mai koi Aisa prb nahi hua ……usaki body weight to bad Rahi hai bhai ki bhi tabiyet achi hai body vagere 7 month Mai 3 month pahle ka bhi sex majud hai to kya kareee

    • पालकांना hiv/aids असेल तर मुलांना असायलाच हवा असे काही नाही. मुल पोटात असताना ही जरी आईला hiv असेल तरीही नवीन औषधप्रणालीच्या मदतीने तो टाळता येतोच की. तसेच जर भिती वाटत असेल तर तुमच्या मैत्रिणीची पुन्हा चाचणी करता येईलच की (तिच्या संमतीने). कुणाचे वजन, तब्येत वाढते आहे म्हणून त्याला hiv आहे वा नाही हे कळत नाही त्यासाठी चाचणी/टेस्ट च करावी लागते.

      असुरक्षित शारीरिक संबंध आल्यापासून (निरोध शिवाय केले गेलेले शारीरिक संबंध) तीन महिन्यांनी hiv साठी चाचणी करायची असते. (या 3 महिन्यांच्या कालावधीला WINDOW PERIOD असे म्हणतात. अधिक माहिती वरील लेखात व त्याखालील कमेंंट मध्ये तुम्हाला मिळेल). या चाचणीचा जो निकाल येईल तो बरोबर असेल. त्यामुळे घाबरु नका. जर तुमच्या मैत्रिणीच्या शरीरात hiv नसेल तर तुम्हाला त्याला संसर्ग नाही होणार.
      लोकांवर विश्वास न ठेवता तुम्हाला काय वाटतं हे जास्त महत्वाचे आहे. तुमच्या मैत्रिणीला तुमच्या साथीची गरज असू शकते. तिच्या पालकांंना hiv होता त्यात तिची काही चूक नाही. हे नेहमी लक्षात ठेवा.
      सावधानगिरी म्हणून शारीरिक संबंध करताना नेहमी (मूल नको असल्यास व std पासून बचावासाठीही) निरोधचा वापर करावा.

  31. Sachin says:

    सर माझे काही दिवसांपूर्वी. एका पुरूषाबरोबर अनैसर्गिक संबंध 3वेळा झाला होता.. नंतर समजले की त्या व्यक्तीला एड्स आहे. मी संबंध झाल्यानंतर6–7महिन्यानी. रक्त तपासले रिपोर्ट निगेटिव्ह आहेत..तरी परत तपासणी करावी लागेल का????

    • असुरक्षित शारीरिक संबंध आल्यानंतर 3 महिन्यांनी चाचणी केल्यास अचूक निदान होते. तुम्ही जर 6 ते 7 महिन्यांनतर तपासणी केली व जर रिपोर्ट निगेटिव्ह आहेत तर परत तपासणी करायची गरज वाटत नाही पण तुमच्या मनातली भिती घालवण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा चाचणी करावीशी वाटत असेल तर तुम्ही करु शकता. शक्य झाल्यास एखाद्या समुपदेशकांना भेटून घ्या.

  32. Anil says:

    Sir eka callgirl shi kapde n kadta ,varun vina kandom sex kela ani sperm tecycha var padle tr hiv hoto ka

    • जर निरोध न वापरता लैंगिक संबंध आले असतील, लिंग योनी वा गुदा प्रवेश झाला असल्यास अन समोरच्या व्यक्तीच्या शरीरात hiv चा विषाणू असल्यास तुम्हाला hiv चा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. वरील लेखात दिल्या प्रमाणे असुरक्षित शारीरिक संबंध (निरोध शिवाय आलेले संबंध) आल्यानंतर तीन महीने थांबुन चाचणी करावी. त्यामधुनच नक्की काय? याचे उत्तर मिळेल.
      तेव्हा या नंतर कधीही लैंगिक संबंध करताना निरोध वापर करा. अन जर पुन्हा निरोध शिवाय संबंध आले तर त्यापुढे 3 महिने थांबुन नंतर hiv ची चाचणी करावी लागेल. हे लक्षात घ्या.

  33. Kalidas A Shendre says:

    1) एखाद्या अविवाहित पुरुषाने 100 अविवाहित स्त्रियांसोबत शारीरिक संबंध ठेवले परंतु त्या 100 अविवाहित स्त्रियांनी माझ्याशिवाय अन्य कोणत्याही पुरुषांसोबत शारीरिक संबंध नाही ठेवले तर त्या अविवाहित पुरुषाला किंवा त्या 100 अविवाहित स्त्रियांना एच आय व्ही ची बाधा / लागण होऊ शकते का?

    2) एखाद्या अविवाहित स्त्रीने 100 अविवाहित पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले परंतु त्या 100 अविवाहित पुरुषांनी त्या अविवाहित स्त्रीशिवाय अन्य कोणत्याही पुरुषांसोबत शारीरिक संबंध नाही ठेवले तर त्या अविवाहित स्त्रीला किंवा त्या 100 अविवाहित पुरुषांना एच आय व्ही ची बाधा / लागण होऊ शकते का?

    वरील दोन्हीही प्रश्नार्थक स्वरूपाच्या उदाहरणांमध्ये एक गोष्ट अशी आहे की, उदाहरण क्रमांक 1) मध्ये 1 अविवाहित पुरुष आणि 100 अविवाहित स्त्रिया यांच्यात एकनिष्ठता आहे म्हणजेच एकूण 101 जणांमध्ये 102 नंबरचा कोणीताही पुरुष अथवा स्त्री शारीरिक संबंधाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होत नाही. याउलट, उदाहरण क्रमांक 2) मध्ये 1 अविवाहित स्त्री आणि 100 अविवाहित पुरुष यांच्यात एकनिष्ठता आहे म्हणजेच एकूण 101 जणांमध्ये 102 नंबरचा कोणीतीही स्त्री अथवा पुरुष शारीरिक संबंधाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होत नाही.

    कृपया, सर्व सन्माननीय तज्ज्ञ संशोधक, विचारवंत, अभ्यासक यांना मी विनम्रपणे उक्त दोन प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आवाहन व विनंती करतो. कारण, मी आजतागायत वरील दोन्हीही प्रश्न अनेक समुपदेशकांना विचारलेली आहेत. मला त्यांच्याकडून म्हणजेच प्रत्येक समुपदेशकांकडून पुढीलप्रमाणे उत्तर मिळालेले आहे आणि ते म्हणजे, “लैंगिक शारीरिक संबंधामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यात एकनिष्ठता असली पाहिजे. विवाहपूर्व व विवाहबाह्य असुरक्षित व अनैतिक स्वरूपाचे लैंगिक शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे एच आय व्ही ची बाधा / लागण होते. परंतु, या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की, भारतातील सर्वच लोक (काही लोकांचा अपवाद वगळता) अशा प्रकारच्या समजण्यास कठीण असलेल्या शब्दांचा (उदा. एकनिष्ठता व अनैतिक) अर्थ व्यवस्थितपणे समजू शकत नाहीत. त्यामुळे, वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य माणसाला कळतील अशा प्रकारे शब्दशः अर्थाच्या स्वरूपामध्ये उत्तरे मिळाल्यास निश्चितच भारतात एच आय व्ही चे प्रमाण सर्वात कमी होईल व कालांतराने त्याचे पूर्णतः निर्मूलन होईल, असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद!

    • तुमच्या मनात अन डोक्यात बराच गोंधळ चालू आहे असं दिसतंय. नक्की तुम्ही काय शोधताय हे अजून आम्हाला उलगडत नाहिये.
      जसं की तुमचा पहिला प्रश्न ज्यात अविवाहित पुरुष अन स्त्रिया याबाबत बोलला आहात. एक लक्षात घ्या की hiv/aids यांच्या नावातच आहे की हा विषाणू कुणाकडून तरी घेतलेला असतो. जर कुणाच्याही शरीरात हा नसेल तर इतरांना त्याचा संसर्ग कसा होणार? वरचा लेख नीट वाचला असता तर तुम्हाला हे प्रश्न नसते पड्ले तरी पाहूया यामधलीच दुसरी गोष्ट, फक्त शारीरिक संबंधातून हा विषाणूचा संसर्ग होत नाही तर इतर मार्ग ही आहेत्च की. या मार्गाद्वारे जर या 100 मध्ये कुनालाही विषाणूचा संसर्ग झाला तर बाकीच्यांना संसर्गाची शक्यता आहेच ना.
      दुस-या प्रश्नातही अशीच शक्यता आहे. अन आपण अविवाहित असणं हा काही criteria नाहिये ना.

      आम्हाला हे कळत नाही की जर 1 व्यक्ती 100 महिलांसोबत संंबंध ठेवतो तर तो एकनिष्ठ कसा? तुमची एकनिष्ठ असण्याची व्याख्या आम्हाला तरी बुचकळ्यात टाकणारी आहे.
      बाकीच्या समुपदेशकांप्रमाणे आम्ही तुम्हाला काही सांगणार नाही. कारण नैतिक अनैतिक असं काही नसतं. कारण नैतिक अनैतिक हा मुद्दा व्यक्तिपरत्वे व परिस्थितीनूसार बदलतो. तसेच विवाहपूर्व व विवाहबाह्य याबाबतही हेच मत आहे. कुणाला उपदेश देण्यापेक्षा सुरक्षित कसं राहता येईल हे लोकांना सांगायचा आमचा प्रयत्न असतो. तुम्हालाही हेच सांगणे आहे की, वरील लेखात ज्या मार्गाने hiv /aids चा संसर्ग होऊ शकतो त्यासाठी काय काळजी घ्यावी हे सांगितले आहे. त्यानूसार सावधनगिरी पाळावी म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भारतात एच आय व्ही चे प्रमाण सर्वात कमी होईल व कालांतराने त्याचे पूर्णतः निर्मूलन होईल, असा आम्हालाही विश्वास वाटतो. धन्यवाद!

      जर कुणाशी बोलावसं वाटत असेल तर खालच्या लिंकवर क्किक करा.
      https://www.facebook.com/PrayasHealthGroup/photos/a.337301306628060/898328663858652/?type=3&theater

  34. राहुल says:

    सर माझे वेश्याबरोबर संबंध आले त्या दरम्यान निरोधचा वापर केला होता परंतु निरोध काढताना योनीचा स्राव माझ्या बोटाना लागला व नंतर लिंगाची कातडी पीठामागे करताना त्या बोटानंचा स्पर्श लिंगाला झाला अाणि त्या वेश्याचे स्तंन मी तोंडात घेतले त्या दरम्यान मला खोखला होता तर HIV विषाणुं माझ्या तोंडा द्ववारे जाऊन HIV होऊ शकतो का कारण मला त्या दरम्यान खोखला होता आणि मी सर्व घटना घडल्यानंतर २४ दिवशी मी RNA PCR ही टेस्ट केली ती निगेटिव आली तर मी Safe आहे का

    • खरं तर hiv चे संक्रमण होण्यासाठी पुढच्या व्यक्तीकडे hiv चा विषाणू असणं गरजेचं असतं. अन तुम्ही सांगितल्यानूसार पाहिलं तर शक्यता फारच नगण्य आहे. नाही च्या बरोबरच. पण जर तुम्हाला भिती वाटतच असेल तर तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा चाचणी करुन घेऊ शकता.
      गरज वाटल्यास वरचा लेख पुन्हा वाचा.

  35. Vinayak says:

    मी एका महिला सोबत संभोग केला निरोध चा वापर पण केला होता पण तिचा स्तन मधून दृध माझ्या पोटात गेलं तर मला hiv होऊ शकतो का आणि निरोध सुद्धा फाटलं होत पण मी लगेच बद्दल plz help mi plz

    • आपण वरील लेख वाचलाच असावा. तरीही काही गोष्टी पुन्हा पाहूया… आधी हे लक्षात घ्या की जर पुढील व्यक्तीला hiv/aids चा संसर्ग असेल तर त्याचा संसर्ग दुस-या व्यक्तीला होतो. अन एखाद्या व्यक्तीला hiv/aids आहे की नाही हे पाहून लक्षात येत नाही. चाचणी केल्याशिवाय संसर्ग आहे आपल्याला झालाय कळत नाही.
      दुधामुळे hiv/aids चा संसर्ग होत नाही. तो कोणत्या प्रकारे होतो याबाबत वर लेखात दिलेले आहेच. जर निरोध फाटला असल्यास व पुढच्या व्यक्तीस hiv/aids संसर्ग असल्यास तुम्हाला व्हायची शक्यता जास्त आहे. तुम्हाला चाचणी करावी लागेल. त्यासाठी ३ महिने वाट पाहून मग तपासणी करा. त्याचे कारण वरील लेखात निदान कसं करायचं? या मुद्द्याखाली दिलेले आहे.
      निरोध फाटला याचा अर्थ तुम्ही निरोध वापरताना काळजी घेतली नाही. योग्य काळजी कशी घ्यावी त्यासाठी पुढील लिंक नक्की पहा.
      https://letstalksexuality.com/use-of-men-condom/,
      https://letstalksexuality.com/condom-part-2/

  36. Mahesh says:

    Sir me ek veshya sobat sabhong thevala hota 2 condom use kela sabnhong zhalya nantar mi condom fatala aahe ka nahi chek karnyasathi haath lavala aani to haath mazhya lingaala sparsh zhala …….sir hiv virus lingaat entry karu shakatat ka

    • खूप पुरुषांना असंच वाटतं की दोन कंडोम म्हणजे जास्त प्रोटेक्शन मिळेल. पण असं काही नसतं. यामुळे जास्त धोका वाढतो.
      खरंतर एकच कंडोम पुरेसा सुरक्षित आहे. एकाच वेळी दोन निरोध लावल्याने एकतर निरोध फाटू शकतो वा सटकू शकतो. तुमच्या बाबतीत तेच झालं.
      राहिला प्रश्न hiv/aids च्या संसर्गाचा तर तुम्ही सांगत आहात तो मुद्दा फार जर तर चा आहे. अन निरोध फाटला याचा अर्थ संसर्गाची शक्यता वाढते.
      आपण वरील लेख वाचलाच असावा. तरीही काही गोष्टी पुन्हा पाहूया… आधी हे लक्षात घ्या की जर पुढील व्यक्तीला hiv/aids चा संसर्ग असेल तर त्याचा संसर्ग दुस-या व्यक्तीला होतो. अन एखाद्या व्यक्तीला hiv/aids आहे की नाही हे पाहून लक्षात येत नाही. चाचणी केल्याशिवाय संसर्ग आहे आपल्याला झालाय कळत नाही.
      दुधामुळे hiv/aids चा संसर्ग होत नाही. तो कोणत्या प्रकारे होतो याबाबत वर लेखात दिलेले आहेच. जर निरोध फाटला असल्यास व पुढच्या व्यक्तीस hiv/aids संसर्ग असल्यास तुम्हाला व्हायची शक्यता जास्त आहे. तुम्हाला चाचणी करावी लागेल. त्यासाठी ३ महिने वाट पाहून मग तपासणी करा. त्याचे कारण वरील लेखात निदान कसं करायचं? या मुद्द्याखाली दिलेले आहे.
      निरोध फाटला याचा अर्थ तुम्ही निरोध वापरताना काळजी घेतली नाही. योग्य काळजी कशी घ्यावी त्यासाठी पुढील लिंक नक्की पहा.
      https://letstalksexuality.com/use-of-men-condom/,
      https://letstalksexuality.com/condom-part-2/

  37. Samrat says:

    Sir mazhya aangavar lal rangachya resha yetat shariravar kuthehi yetat kahi velani te barya hotat satharan sandhyakali dok dukhat aani potat gass hoto hiv test negative dakhavali mala hiv zhala asel ka sir

    • तुम्ही डॉक्टरांना भेटा, ते तुम्हाला हे का होत आहे त्याबाबत मार्गदर्शन करतील. तुमच्या बाबतीत घडणाऱ्या बाबींचा व hiv चा काही संबंध नाही हे तुम्हाला वरील लेख वाचून कळलंच असेल.

  38. Guru says:

    लग्न झालेल्या महिला सोबत५ते६ वेळेस न कंडोम वापरता शारीरिक संबंध झाले असेल तर hiv होऊ शकतो का ,

    • पहिली गोष्ट तुम्ही निरोधचा वापर केलेला नाही याचा अर्थ तुम्ही जास्त रिस्क मध्ये आहात.
      दुसरी गोष्ट अशी की तुम्हा दोन लोकांना जर hiv चा संसर्ग नसेल तर एकमेकांना कसा होईल संसर्ग. एका असेल तर ती दुसऱ्या ला असू शकतो.
      तिसरी गोष्ट ही की फक्त पाहून hiv चा संसर्ग आहे की नाही हे कळत नाही. त्यासाठी चाचणी करावी लागते. सरकारी दवाखान्यात चौकशी करा चाचणी साठी.
      चौथी गोष्ट ही की तुमचे शेवटचे असे निरोधशिवाय आलेल्या संबंधापासून 3 महिने वाट पाहून मगच चाचणी करावी.
      अधिक माहितीसाठी पुढील लिंक वाचा
      https://letstalksexuality.com/hiv_aids/
      https://letstalksexuality.com/free-hiv-check-up/

  39. बाळासाहेब काळे says:

    एक विधवा स्त्री जिचा पती आठ वर्षांपुर्वी एड्स ने मृत्यू झाला तर या स्री ने कुठल्याही प्रकारची एच आय व्ही तपासणी केली नाही . तीला आतापर्यंत कोणत्याही लक्षणे नाहीत तर तीला एच आय व्ही असु शकतो का

    • एच आय व्ही ची टेस्ट केल्याशिवाय कळत नाही की एच आय व्ही चा संसर्ग आहे किंवा नाही ते!
      एच आय व्ही ठराविक अशी काहीच लक्षणे नाही आहेत, त्यामुळे टेस्ट केली तरच सत्यता समोर येईल.

  40. Nilesh says:

    Jar 3 manhinyanni report positive Kinva negetive samjat asel. Pan tya 3 mahinya agodar jar ti sri positive asel tya strishi asurkshit sambhog kela tar HIV hovu shakato ka. Aani samja jar hiv test 3 mahinya agodar tapasalyane negative ali mhanun asurkshit sambhog karu shakato ka. e.g. aaj test report negetive aala aahe tar aaj asurkshit pane karu shakto ka. Bhavishyat tyacha dhoka rahil ka.

    • या तीन महिन्याना विंडो पिरेड असं म्हणतात. यानंतर अलायझा चाचणी केली जाते. तीन महिन्याच्या आधी पीसीआर या चाचणीद्वारेही निदान होते पण अलायझा चाचणी खूपच अचूक असते. जरी पीसीआर केली तरी एलायझा टेस्ट करुन निदान निश्चित केलेच पाहिजे.
      या विंडो पिरेड मध्ये जरी लक्षात येत नसेल तरी ही व्यक्ती जर पॉझिटिव असल्यास इतरांना संक्रमित करु शकते. तेव्हा या काळात निरोध शिवाय शारीरिक संबंध करुच नयेत.
      असुरक्षित शारीरिक संंबंध आल्यानंतर 3 महिन्यानी चाचणी चा डॉक्टर सल्ला देतात. त्या आधी अलाएझा चाचणी करुन काही उपयोग नाही. यानंतर (विंडो पिरेड नंतर) जर टेस्ट निगेटिव्ह आली तर भविष्यात जोपर्यंत असुरक्षित शारीरिक संंबंध किंवा वर जी संसर्गाची कारणे दिली आहेत त्यापैकी काही घडत नाही तोपर्यंत काहीही भिती नाही.
      तसेच टेस्ट निगेटिव्ह आल्या नंतर जर तुमचा जोडिदार व तुम्ही इतर कोणाशीही असुरक्षित शारीरिक सम्बन्ध ठेवत नसाल तर तुम्हामध्ये निरोधशिवाय शारीरिक संबंध ठेवायला काहीच हरकत नाही.

  41. Ganesh says:

    Sir mazi pani hiv positive Aahe aani mi tichya sobat bina condam ne sambhog pan kela tehi purn 20 divas tar mala hiv honar kay AATA 6 mahine zale mi raktachi tapasani 2 da keli report normal Aahe tar mala hiv hoyil ka

    • जर रिपोर्ट निगेटिव्ह आले असतील व त्यानंतर जर असुरक्षित शारीरिक संबंध आलेले नसतील तर HIV होण्याची शक्यता दिसत नाही. पण शंका असल्यास पुन्हा डॉक्टरांना भेटाल.

      पत्नीलाच HIV असल्याने भविष्यात वारंवार अशी भीती किंवा शंका वाटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. सध्या नवीन व प्रभावी औषधप्रणाली डॉक्टरांकडे उपलब्ध आहेत. तुम्ही डॉक्टरांना भेटून त्याविषयी बोलू शकता, सोबतच पत्नीलाही घेऊन जाल. त्यांच्यासाठी सुद्धा ART नावाची औषधप्रणाली डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरु करता येईल.
      आम्ही आमच्या प्रयास अमृता क्लिनिक मध्ये याविषयी सल्ला, चाचणी व उपचार करतो. आमची मदत लागल्यास पुढिल पत्त्यावर भेट देऊ शकता.
      वेळ – दुपारी 1 ते संध्या 6.
      पत्ता : प्रयास-अमृता क्लिनिक, आठवले कॉर्नर, कर्वे रोड, डेक्कन जिमखाना, पुणे – 411 004, दूरध्वनी: 8605882649 / 8087015726
      (गुगल लोकेशन https://goo.gl/maps/L5bjinGw2r5JbgB56)

  42. SHWETA says:

    HI SIR JR 4 LOANSOBAT SAMNDH THEVLA ANI TYA 4 HI LOKANA HIV NASEL TR MLA HOU SHAKTO KA

    • एच आय व्ही चा संसर्ग जर एच आय व्ही चा संसर्ग झालेल्या व्यक्तिसोबत असुरक्षित (निरोध शिवाय केलेले) संबंध ठेवले तरच होऊ शकतो. इतर ही काही मार्ग आहेत त्यांच्या माहितीसाठी सोबतची लिंक पहा https://letstalksexuality.com/hiv_aids/)
      त्यामुळे जर अश्या लोकांसोबत संबध ठेवले असतील ज्यांना HIV चा संसर्ग झालेला नाही, तर एड्सचा संसर्ग होण्याची काहीच शक्यता नाही. पण निरोध शिवाय संबंध केल्याने लिंगसांसर्गिक आजारांचा संसर्ग होण्याची मात्र शक्यता असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap