पूर्वी कायद्याने केलेल्या बलात्काराच्या व्याख्येनूसार, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी संभोग होणे (पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनीमार्गात घालणे) गरजेचे मानले जायचे. कारण संभोग झाला आहे हे सिध्द झाले नाही तर बलात्काराचा गुन्हा होत नसे.
२०१३ मध्ये भारतातील ‘बलात्कार’ याची व्याख्या व्यापक करण्यात आली आहे, ज्याच्यांमध्ये
- दुसऱ्या व्यक्तीच्या योनीमध्येच नाही तर तोंड, गुदद्वार, मूत्रमार्ग किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवांमध्ये कोणत्याही हद्दीपर्यंत शिस्न किंवा शरीराचा कोणताही भाग, कोणत्याही वस्तू आत घालणे किंवा महिलेला आपल्याबरोबर, दुसर्या व्यक्तीबरोबर असंं करण्याची जबरदस्ती करणे.
- खासगी अवयवांना तोंड लावणे किंवा स्पर्श करणे याचाही समावेश यामध्ये केला आहे.
- या नविन सुधारलेल्या कायद्यानुसार यामध्ये परवानगीची वयमर्यादा (Age of Consent) १८ वर्षापर्यंत वाढवलेली आहे. ज्याचा अर्थ असा आहे कि, अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या महिलेवर कोणत्याही लैंगिक क्रिया करण्याची तिची परवानगी असली तरी काद्यानुसार तो बलात्कार आहे.
पुरावा म्हणून काय करावे :
बलात्कार झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात . कारण साक्षीदार किंवा पुरावा मिळेलच असे नाही. म्हणून पुरावा मिळण्यासाठी खालील बाबी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
- अंगावरील कपडे बदलू अथवा धुवू नये.
- योनीचा भाग धुवू नये, अंघोळ करु नये.
- पोलिसांकडे लगेचच तक्रार करावी व जाताना सोबत विश्वासू व्यक्तीला घेऊन जावे.
- पोलिसांकडे तर करताना बलात्कार करणारी व्यक्ती अनोळखी असेल तर त्याचे सविस्तर वर्णन सांगावे. त्याने कोणते कपडे घातले, भाषा, दिसणे इ.
- डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि रिपोर्ट घ्यावा.
लक्षात ठेवा
बलात्कार झाला म्हणजे स्त्रीने स्वत:ला अपराधी समजण्याची गरज नाही. याउलट अन्यायाविरुद्ध न्याय मिळवणे हा आपला अधिकार आहे असे मानून न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी.
No Responses