लैंगिक संबंध सुखकर असायला पाहिजेत. तसंच ते सुरक्षित असणंही आवश्यक आहे. सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे
– असे संबंध ज्यात जबरदस्ती नाही
– ज्यामध्ये नको असलेल्या गर्भधारणेची भीती नाही
– ज्यामध्ये एकमेकांना लिंगसांसर्गिक आजाराची लागण होण्याचा धोका नाही
ही काळजी घेतली तर आपले लैंगिक संबंध सुरक्षित मानता येतील. दोन्ही जोडीदारांना कशातून सुख मिळतं हे समजून घेतलं तर जबरदस्ती टाळता येईल. गर्भधारणा टाळायची असेल तर निरोध किंवा इतर गर्भनिरोधकांचा वापर एकमेकांच्या संमतीने केला तर तो धोका, भीती टळेल. एच आय व्ही, एच पी व्ही, ब प्रकारची कावीळ, गरमी, परमा आणि इतरही लिंगसांसर्गिक आजारांची लागण टाळण्यासाठी निरोधचा वापर करणं सर्वात उत्तम.
Image by : Racool_studio/ https://www.freepik.com
No Responses