जननेंद्रियांवरील चामखीळ/मस : जनायटल वार्टस

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) मुळे होणारा हा आजार आहे. पॅपिलोमा विषाणूची लागण झालेल्या बहुतेक व्यक्तींना त्याची कल्पना नसते कारण त्यांना काही लक्षणं जाणवतीलच असं नाही. मात्र लक्षणं नसली तरीही लागण झालेल्या व्यक्तीकडून दुसऱ्याला एचपीव्हीची लागण होऊ शकते.

लक्षणं
 • जननसंस्थेच्या त्वचेवर चामखिळीसारखे, फुलकोबीसारखे दिसणारे मस
 • मस लालसर, मऊ, लांबट असतात. बटाटयावर येणा-या कोंबासारखेच पण लालसर रंगाचे हे मस लगेच ओळखू येतात. कधी कधी हे मस त्वचेच्या रंगाचेही असू शकतात.
 • पुरुषांना हे मस शिश्नावर कोठेही येतात. जर समलिंगी संबंध असल्यास हे मस गुदद्वाराच्या सभोवताली येतात.
 • स्त्रियांच्या बाबतीत हे योनीद्वारावर व आतपण असतात. दिसत नसले तरी संबंधांच्या वेळी त्रास होऊ शकतो.
 • उपचार न केल्यास हे मस खूप भराभर वाढतात.
निदान कसं करायचं?

यासाठी रक्ततपासणीही उपलब्ध आहे.

उपचार

हे मस उपचाराशिवाय आपोआप जिरत नाहीत. पोडोफायलिन मलम यासाठी दर आठवडयात 1-2 वेळा लावल्यास हे कोंब हळूहळू जिरून जातात. गरोदरपणात हे मलम वापरू नये कारण त्यामुळे गर्भावर दुष्परिणाम होऊ शकतात.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

4 Responses

 1. AMITRAJ says:

  He same mala zal ahe
  plus lavkr virya patan suddha hot ahe

  agodr hot navte 1 year zale hot ahe
  agodr time changa hota
  ata khup kami time ahe

  • ब-याच वेळा काही लक्षणे वाचली वा पाहिली असता अरे हे तर आपल्याला पण आहे असं वाटतं. नक्की काय आहे हे डॉक्टरांना भेटल्याशिवाय लक्षात येत नाही. आधी डॉक्टरांना भेटा.
   लवकर वीर्यपतन होण्याची अनेक कारणे आहेत. त्याचा संंबंध कशासोबत लावणं घाईचं होईल.
   शीघ्रपतनाबाबत अधिक माहितीसाठी सोबतची लिंक पहा.
   https://letstalksexuality.com/premature-ejaculation/
   https://letstalksexuality.com/premature-ejaculation-2/

 2. किरण कांबळे says:

  माझ्या पण लिंगावर असाच फोड आला आहे,
  आणि तो वाढतच आहे, काय करावं सांगा please

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap