लैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार

लैंगिक संबंधातून पसरणारे आजार वेगवेगळ्या प्रकारच्या जंतुसंसर्गातून पसरतात. जंतू तीन प्रकारचे असतात. जीवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस) आणि परजीवी (पॅरासाइट).
  •  जीवाणूंमुळे होणारे संसर्ग – क्लॅमेडिया, गनोरिया, सिफिलिस
  • विषाणूंमुळे होणारे संसर्ग – जननेंद्रियांवरील मस किंवा चामखीळ (वॉर्ट) – एचपीव्ही, जननेंद्रियांवरील नागीण (जनायटल हर्पिस), ब व क प्रकारची कावीळ, एचआयव्ही/एड्स
  • परजीवींमुळे होणारे संसर्ग – ट्रिक, जांघेतील उवा, खरूज

याशिवाय बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस आणि कॅण्डिडा या जंतुलागणींमुळे लिंगसांसर्गिक आजारांचा धोका जास्त वाढतो.

(वरील सर्व संसर्गाच्या सविस्तर लिंक लेखाच्या खाली दिलेल्या आहेत.)

स्त्रियांमधली काही सर्वसामान्य लक्षणं
  • लघवी करताना वेदना
  • लैंगिक संबंधांच्या वेळी दुखणं
  • दोन पाळीच्या मध्ये रक्तस्राव, लैंगिक संबंधांच्या वेळी रक्तस्राव
  • योनीस्रावाचा रंग बदलणं – पिवळा, हिरवट किंवा लाल रक्तस्राव
  • योनीस्रावाला उग्र व घाण वास
  • मायांगामध्ये खाज – गुदद्वारातून स्राव
  • जननेंद्रियांवर किंवा गुदद्वारावर फोड, पुळ्या, गाठी, व्रण
  • ओटीपोटात दुखणं
पुरुषांमधली काही सर्वसामान्य लक्षणं
  • लघवीच्या वेळी किंवा लैंगिक संबंधांच्या वेळी वेदना
  • लिंगातून किंवा गुदद्वारातून पूसारखा स्राव
  • जननेंद्रियांवर किंवा गुदद्वारावर फोड, पुळ्या, गाठी, व्रण
  • जांघेमध्ये गाठी येणे, त्या फुटणे किंवा चिघळणे
  • एका किंवा दोन्ही वृषणांमध्ये वेदना
लक्षात ठेवा
  • न घाबरता आणि लाजता डॉक्टरांची किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घ्या.
  • इतर आजारांसारखेच हे देखील आजार आहेत आणि त्यांच्यावर उपचारदेखील आहेत.
  • वेळीच निदान झालं तर बहुतेक लिंगसांसर्गिक आजार बरे होऊ शकतात.
  • वेळीच उपचार झाले नाही तर मात्र काही आजारांचं घातक रोगांमध्ये रुपांतर होऊ शकतं.
अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा 

https://letstalksexuality.comhiv_aids/

https://letstalksexuality.comgenital-herpes/

https://letstalksexuality.comgonorrhea/

https://letstalksexuality.comchancroid/

https://letstalksexuality.comsyphilis/

https://letstalksexuality.comhepatitis-b/

https://letstalksexuality.comgenital-warts/

https://letstalksexuality.comvaginal-infections/

https://letstalksexuality.comreproductive-tract-infections/

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

6 Responses

  1. Anonymous says:

    लिंगातून पूसारखा स्राव
    जननेंद्रियांवर किंवा फोड, पुळ्या
    मला झाल आहे काय करायला पाहिजे.

  2. रूची says:

    मला माझ्या योनी तुन घट वॉईट रंगा चे विर्य जात आहे तर मी काय करावे

  3. Aniket says:

    माझ्या लिंगाच्या चमड़ी वर सुज आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap