सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड २ – बोल की लब आजाद है तेरे – पूर्वार्ध 

आज सिझन २ मधला दुसरा भाग : बोल की लब आजाद है तेरे – पूर्वार्ध  आपल्या साठी घेऊन आलो आहोत. समाजमाध्यमांवर चालू असणा-या #मीटू चळवळीबाबतच्या अनेक प्रश्नांवर आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी साधना खटी व शंकर आलेले आहेत, त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता #मीटू बाबत अधिक माहिती घेऊया.

 

मी टू चळवळीचे महत्व काय आहे?

मुलींच्या दृष्टीने आणि एकूण स्त्रियांच्या दृष्टीने, समाजासाठी – काही महिने किंवा वर्षांपूर्वी घडून गेलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यातून काय साध्य होईल?

चळवळीचे एकीकडे स्वागत होत असताना अनेक शंका आणि प्रश्न ही अनेकांकडून उपस्थित होत आहेत?  उदा. मुली इतके दिवस गप्प का बसल्या? जेंव्हा घडलं तेंव्हाच का नाही बोलल्या?, सवंग प्रसिद्धीसाठी स्त्रिया जुन्या गोष्टी उकरून काढत आहेत किंवा खोटे आरोप करत आहेत. इ. 

मुलींसाठी हे इतकं सोपं आहे का?

या चळवळीने स्त्री विरुद्ध पुरुष असं काही चित्र निर्माण केलं आहे का?

पुरुष महिलांसोबत काम करायला घाबरतील का? 

पुरुषांनी घाबरण्यासारखं यात काही आहे का?


इ.विषय या पॉडकास्टमध्ये चर्चेस आलेले आहेत.

आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला नक्की कळवा…

तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आम्हा खाली  कमेंटमध्ये नक्की लिहा. 

 

https://soundcloud.com/sexaanibarachkahi/sabk-season2-ep2

तेव्हा लवकरच पुन्हा भेटूया पुढच्या बोल की लब आजाद है तेरे – उत्तरार्ध या  भागात तोपर्यंत ऐकायला विसरू नका.. सेक्स आणि बरंच काही सिझन २.  

सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड २ – बोल की लब आजाद है तेरे – पूर्वार्ध 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

 1. Jayshree says:

  बरेचदा office मधे एखादा पुरुष कर्मचारी /अधिकारी एखाद्या महिला कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन दुसऱ्या महिलेला जी त्या पुरुष कर्मचार्याला कोणता रिस्पोन्स देत नसेल तिला हिणवण्याचा प्रकार होतो . तेव्हा हे कसं handle करायचं ?

  • तुम्ही विचारलेल्या प्रश्नामध्ये हिणवते म्हणजे नक्की काय करते? हे आमच्या लक्षात येत नाही आहे, जरा सविस्तर दिले असते तर उत्तर द्यायला सोपे झाले असते. तरीही हिणवणे याचा आपण पुढील दोन प्रकारात विचार करु शकतो.
   १. एक असं की, त्या महिलेकडून जर लैंगिक शब्द वापरले जात असतील किंवा सेक्सुअल इंटरेस्ट सारखं बोललं जात असेल. उदा: तु त्याला उत्तर देत का नाही? तो किती हॅंडसम आहे, सेक्सी आहे, तो किती चांगला आहे किंवा बरोबर याच्या विरुद्ध बोलणं जसं की, तुझी लायकीच नाही त्याला हो म्हणायची, तरी तो तुझ्यावर मरतोय, वैगेरे.
   २. दुसरं असं की, कामानिमित्ताने/ कामाच्या कमतरतेमधून ती महिला हिणवते आहे.

   जर त्या पुरुषाच्या लैंगिक मागण्या पूर्ण व्हाव्यात या उद्देशाने ती महिला बोलत/ हिणावत असल्यास दोन गोष्टी करता येतील.
   अ) दोघांना पार्टी करुन अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे केस टाकू शकता येते. (अंतर्गत तक्रार निवारण समिती व कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध कायदा, २०१३ बाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा. https://letstalksexuality.com/sexual-harrassment-at-workplace-2/)
   ब) त्या पुरुषावर केस टाकून, अर्जाच्या शेवटी त्याला सहाय्य करणारी व्यक्ती म्हणून तिचीही चौकशी व्हावी, असं सांगता येते. कारण कायदा हा महिलांनी महिलांविरुद्ध तक्रार करायची नाही असे म्हणतच नाही.

   ही केस टाकण्यासाठी पुरावा असण्याची गरज नाही आहे, पण जर शक्य असल्यास त्या दोघांचं बोलणं रेकॉर्ड करु शकल्यास अजून उत्तम. तसेच तो पुरुष ब-याचदा प्रत्यक्ष बोलणार नाही किंवा ती महिलाही प्रत्यक्ष बोलणार नाही, पण जेव्हा अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे जो अर्ज कराल त्यात या बाबी सविस्तर लिहिल्या गेल्या पाहिजेत.

   या पलिकडे जाऊन अजून एक गोष्ट महत्वाची आहे की, अशा गोष्टी हाताळण्यासाठी महिलांनी सक्षम होणं फार गरजेचे आहे. कारण अशा समस्या बसमध्ये, मॉलमध्ये, रस्त्यावर वा कुठेही येऊ शकतात. येणा-या अशा समस्यांना सामोरं जाण्यासाठी महिलांना मानसिकरित्या सक्षम व्हायलाच लागेल. नजरेत नजर घालून “मला” हे अजिबात आवडलं नाही. हे ठणकावून सांगता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. त्यामुळे अशा समस्यांना तोंड देण्याची महिलांची ताकद वाढते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap