छळवणूकीच्या, अत्याचाराच्या अनेक घटना सर्वत्र होताना दिसतात. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी अशा प्रसंगाला सामोरे जावे लागते. मात्र “मस्करी कळत नाही का” किंवा “मी फक्त गंमत करत होतो” असे सांगून सहसा असे प्रकार जास्त गांभीर्याने घेतले जात नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही कारणावरून दुसऱ्यावर हसते किंवा त्याला सहज चिडवते तेव्हा त्याच्यामागचे कारण व आपण सहज केलेल्या मजेचा, विनोदाचा, मस्तीचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो? याचा विचार करण्याची गरज आहे.
मुलगे/ पुरुष म्हणजे काय? मुलग्यांवर देखील अत्याचार होतात का? अत्याचार कोणत्या प्रकारच्या लोकांवर होतात? लोक अत्याचार किंवा बुलिंग का करतात? गंमत आणि अत्याचार किंवा बुलिंग यामध्ये काय फरक आहे?
महाविद्यालयीन युवक युवतींची याविषयीची मते आणि अनुभव जाणून घेण्यासाठी तथापिच्या पुढाकाराने आय सोच प्रस्तुत ‘ मुलगे/पुरुषा यांच्यासोबत होणारी छेडछाड’ (Male harassment) हा व्हिडीओ अवश्य पहा. याविषयीचे तुमचे अनुभव आणि मते नक्की सांगा.
चला तर सगळे मिळून छेडछाडीविरुद्ध आवाज उठवूया…
No Responses