लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवूयात. लैंगिक छळाविषयी मोकळेपणानं बोलणं ही लैंगिक शोषण थांबविण्याची पहिली पायरी आहे. इतरांशी बोलल्यानं समस्या काय आहे, समस्येचं अस्तित्व आणि गांभीर्य काय आहे हे समजायला आणि पर्यायानं उपाययोजना शोधायला मदत होते. आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील, घडत असतील तर गप्प राहू नका. आपण गप्प राहिलो, सहन करत राहिलो तर समोरच्या व्यक्तीचं जास्त फावतं आणि शोषण तसंच चालू राहतं. स्वतःला दोष देऊ नका आणि उशिर करू नका. एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोला. तुमच्या आयुष्यातील किंवा आजूबाजूला घडणाऱ्या लैंगिक छळाच्या घटना किंवा तुम्ही अशा प्रसंगांवर कशी मात केलीत याविषयी आम्हाला letstalksexuality.com@gmail.com यावर नक्की लिहा. तुमची ओळख कुठेही उघड होणार नाही.
No Responses